xi-jinping 
ग्लोबल

जीनपिंग टीकाकाराची हकालपट्टी; कम्युनिस्ट पक्षाचा प्राध्यापिका काई शियावर बडगा

वृत्तसंस्था

बीजिंग - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कट्टर टीकाकार असलेल्या प्राध्यापिका काई शीया यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली. सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाने हा निर्णय घेतला. सेंट्रल पार्टी स्कूल या संस्थेच्या संकेतस्थळावरील सूचनेचा हवाला देत हाँगकाँगमधील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने हे वृत्त दिले. 

देशातील आर्थिक आणि सामाजिक समस्यांपासून तसेच पक्षातील प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जिनपिंग यांनी सीमेवरील संघर्षासाठी भारताला डिवचले असा आरोप काई यांनी केला होता.

काई यांनी जून महिन्यात ब्रिटनमधील गार्डीयन वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, जिनपिंग यांनी आपे स्थान आणि अधिकार बळकट करण्यासाठी भारताला डिवचण्याशिवाय अमेरिकाविरोधी भावनेला खतपाणी घातले.

चीनला साऱ्या जगाचा शत्रू बनविण्यात काय फायदा आहे, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले होते. जिनपिंग यांनी अध्यक्षांच्या दोन कार्यकाळांची मर्यादा हटवण्यासाठी घटना बदल केला. यामागे त्यांचा अाजन्म पदावर राहण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोरोना मृतांची आकडेवारी दडपणे, जानेवारीत साथीची तीव्रता लक्षात आल्यानंतरही निर्मूलनासाठी पुरेसे प्रयत्न न करणे असे आरोपही काई यांनी केले. लोक सत्य बोलू शकत नसल्यामुळे चीनची वाटचाल संकटाकडे सुरु असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या संस्थेत काम
काई 68 वर्षांच्या असून त्या सेंट्रल पार्टी स्कुलमध्ये शिकवायच्या. राजकीय विचारसरणीला चालना देणारी एक महत्त्वाची संस्था म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. 2012 मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी जिनपिंग हे याच शाळेचे प्रमुख होते.

सध्या अमेरिकेत
आपण अमेरिकेत असून सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत असल्याचे काई यांनी या वृत्तपत्राला सांगितले. आणखी भाष्य करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

काई यांच्याविरुद्धचे आक्षेप

  • भाषणांमुळे गंभीर राजकीय समस्या ओढावल्या
  • भाषणांचे स्वरूप अत्यंत तिरस्करणीय
  • भाषणांमुळे देशाचा लौकिकाला तडा
  • राजकीय शिस्तीच्या भंगाचा गंभीर प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT