Mery Christmas Sakal
ग्लोबल

Christmas: विचित्र प्रथांनीही साजरा होतो नाताळ! वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

सकाळ डिजिटल टीम

जगभरात नाताळ (Christmas) मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. परंतु जगातील काही देशांमध्ये नाताळ साजरा करण्याच्या काही विचित्र प्रथा आहेत. यातील काही प्रथांबद्दल :

ऑस्ट्रिया :
ऑस्ट्रियात क्रॅम्पस नावाचा राक्षसासारखा दिसणारा प्राणी आहे, जो सेंट निकोलसचा शत्रू मानला जातो. लहान मुलांना नाताळाच्या आदल्या दिवशी तो उचलून घेऊन जातो असा समज आहे. त्यासाठी राक्षसाचा पेहराव घातलेले पुरुष रस्त्यावर फिरत असतात, जे लहान मुलांना पळवून नेण्यासाठी असतात असा समज आहे . परंतु लहान मुलांनी रस्त्यापासून दूर राहावे हा त्यामागचा उद्देश आहे.

स्‍पेन :
स्पेनच्या कैटालोनियासह अनेक भागात खास परंपरा आहे. ज्यात लाकडी ओंडक्याला एका बाजूने ब्लॅंकेटने झाकले जाते तर, दुसऱ्या बाजूवर चेहरा रेखाटला जातो. त्याला विविध खाद्य पदार्थ, सुकामेवा दाखवला जातो. आणि नंतर त्याच लाकडाने लोकांना मारल्यानंतर त्या ब्लॅंकेटखाली लपविलेले गिफ्ट्स घेतले जातात.

युक्रेन :
युक्रेनच्या संस्कृतीत कोळ्याने विणलेल्या जाळ्याला शुभ प्रतीक मानले जाते. म्हणून कोळ्याने विणलेल्या जाळ्यासारखी सजावट घरांना केली जाते. एका गरीब महिलेकडे ‘ख्रिसमस ट्री’ सजविण्यासाठी पैसे नव्हते. तिच्या घरात असलेल्या कोळ्यांनी स्वतः जाळे विणून घर सजविले होते अशी त्यामागची आख्यायिका आहे.

पोर्तुगाल :
पोर्तुगालमध्ये नाताळच्या दिवशी जेवताना आपल्या ताटांव्यतरिक्त जास्तीची ताटेही वाढली जातात. नाताळाच्या दिवशी आपले पूर्वजही सोबत जेवायला येतात, असे मानले जाते.

चेक प्रजासत्ताक :
येथे अविवाहित मुली दरवाजाला पाठ लावून चपला घालून उभ्या राहतात. पायातील एक चप्पल वर फेकतात. जर चप्पल दरवाज्याच्या समोर पायाच्या पंजाजवळ पडली तर त्यांचे लग्न एका वर्षात होईल आणि जर टाचेच्या दिशेने पडली तर लग्नासाठी त्यांना अधिक वेळ थांबावे लागेल असा त्याचा अर्थ लावला जातो.

नॉर्वे :
नॉर्वेमध्ये अशी मान्यता आहे की काही राक्षसी शक्ती जादुई झाडू घेऊन उडत असतात. म्हणून तेथील सर्वजण घरातील झाडू नाताळाच्या दिवशी लपवून ठेवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT