PNB fraud accused Mehul Choksis Gitanjali Gems 8 other firms cant trade in shares 
ग्लोबल

'डॉमिनिका सरकारने चोक्सीचे अपहरण केल्याचे दावे मूर्खपणाचे'

विनायक होगाडे

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्सी याच्या कथित अपहरणात आपल्या सरकारचा हात असल्याचे दावे निव्वळ मूर्खपणाचे आहेत, असे डॉमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरीट यांनी स्पष्ट केले. हिरे व्यापारी चोक्सी शेजारच्या अँटीग्वामधून गायब झाला होता. तो डॉमिनिकामध्ये सापडला. भारत आणि डॉमिनिका यांच्या सरकारने हातमिळवणी करून हा कट आखला. चोक्सीचे अँटीग्वामधून अपहरण करून त्याला डॉमिनिकामध्ये आणण्याचा कट होता असे आरोप झाले आहेत. भारतातून पलायन केल्यानंतर चोक्सी २०१८ पासून अँटिग्वामध्ये राहतो आहे.

याविषयी स्केरीट यांनी साप्ताहिक कार्यक्रमात भाष्य केले. त्यांनी सांगितले की, आमचे सरकार न्यायालयाला त्यांची प्रक्रिया करू देईल. त्याचवेळी चोक्सीच्या हक्क आणि बंधनांचा आदर केला जाईल. आमचे, अँटीग्वाचे आणि भारताचे सरकार कटासाठी कोणत्याही प्रकारे एकत्र आल्याचे म्हणत असाल तर मला काहीच बोलायचे नाही. आम्ही अशा प्रकारच्या कारवाया, गोष्टींमध्ये आम्हाला गुंतवत नाही. हे हास्यास्पद आहे असे मला म्हणायचे. न्यायालयासमोर हजर झालेल्या व्यक्तीबाबत अशा निराधार आरोपांद्वारे कुणालाही अपप्रचार करावासा वाटणे दुर्दैवी आहे.

स्केरीट यांनी आपल्या समर्थनार्थ एक उदाहरण दिले. डॉमिनिकाचा एक नागरिक अमेरिकेला हवा असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आमचा देश व्यक्ती कोण आहे किंवा त्याच्याकडे किती पैसे असू शकतील यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वागवू शकत नाही. आपले धोरण काहीही असले किंवा आपल्याकडे किती पैसे आहेत किंवा नाहीत यापेक्षा सर्व जण कायद्याला बांधील आहेत.

स्कॉटलंड यार्डकडून चौकशी

चोक्सीच्या कथित छळ आणि अपहरण प्रकरणी स्कॉटलंड यार्डने चौकशी सुरु केल्याचा दावा चोक्सीचे डॉमिनिकातील वकील जस्टीन सायमन यांनी केला. त्यांनी सांगितले की, डॉमिनिकातील काही नागरीक यात सामील आहेत. डॉमिनिका किंवा अँटीग्वाचा हात असल्याचे सिद्ध झाल्यास त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर परिणाम होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT