UNDP Data esakal
ग्लोबल

UNDP Data: हवामानातील बदल कॅन्सरपेक्षाही घातक; यूएनडीपीचा धक्कादायक अहवाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः हवामानातील बदलांमुळे सध्या वातावरण तापलेलं आहे. या मुद्द्यावरुन सर्वत्र वादंग पहायला मिळत आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने एक आश्चर्यकारक खुलासा केलाय.

'यूएनडीपी'च्या अहवालानुसार, वेळेत कार्बन उत्सर्जनाला प्रतिबंध केला नाही तर जगातल्या काही भागांमध्ये याचे विपरित परिणाम दिसून येतील. जगभरात कॅन्सरचे रुग्ण वाढतील, असं या अहवालामध्ये म्हटलं आहे.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि क्लायमेट इम्पॅक्ट लॅब या दोन्ही संस्था वातावरणातील बदलांवर संशोधन करीत आहेत. 'यूएनडीपी'ने सांगितलं की, या समस्येवर केवळ पर्याय शोधून चालणार नाही तर खंबीर पावलं उचलावी लागतील. या वातावरणातील बदलांमुळे मानवाचा पुढचा मार्ग अंधकारमय होण्याचा धोका आहे.

वातावरणीय बदलांमुळे मृत्यूदर तर वाढेलच शिवाय जगण्याचा संघर्ष वाढेल. यूएनडीपीने सांगितलं की, या शतकाच्या अखेर कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढू शकते. ह्यूमन क्लायमेट हॉरिझॉनच्या अहवालानुसार हवेतील कार्बन डायऑक्साईडचा स्तर वरचेवर धोकेदायक होतोय. त्यामुळेच जमिनीचं तापमान वाढत आहे. या बदलांना थांबवलं नाही तर हे बदल मानवजातीसाठी हे घातक ठरतील.

या अहवालामध्ये ढाका आणि बांगलादेशचं उदाहरण देण्यात आलेलं आहे. येथे उत्सर्जनाचं प्रमाण जास्त असेल. त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढेल. यामुळे होणारे मृत्यू हे देशाच्या सध्याच्या वार्षिक मृत्यूदराच्या दुप्पट असू शकतात. अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या दहापट. हे जास्त भीषण असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT