पर्यावरण निधीबाबत भारताने श्रीमंत देशांना सुनावले sakal media
ग्लोबल

पर्यावरण निधीबाबत भारताने श्रीमंत देशांना सुनावले

हवामान बदल परिषदेसाठी येथे आलेले पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज एका मुलाखतीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा केली

सकाळ वृत्तसेवा

ग्लास्गो : पर्यावरण रक्षणासाठी आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाय अमलात आणण्यासाठी विकसनशील देशांना निधी पुरवणे, ही विकसित देशांची जबाबदारी आणि कर्तव्यच आहे. त्याकडे दानधर्म म्हणून पाहू नये, असे भारताने श्रीमंत देशांना आज सुनावले. दरवर्षी शंभर अब्ज डॉलरचा निधी उभारण्याचे आश्‍वासन या देशांना पाळावे, असे आवाहनही भारताने केले.

हवामान बदल परिषदेसाठी येथे आलेले पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज एका मुलाखतीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ‘ही परिषद यशस्वी होण्यासाठी पर्यावरण निधी उभारला जाणे अत्यंत आवश्‍यक आहे. हा निधी उभारण्याची सर्वांत मोठी जबाबदारी विकसित देशांवर आहे. कारण, तापमानवाढीचा वेग रोखण्यासंदर्भातील सर्वांत मोठी त्रुटी म्हणजे या देशांकडून प्रत्यक्ष कृतीचा अभाव. परिषदेचा मसुदा नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यातही निधी उभारण्यात श्रीमंत देशांना अपयश आल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे,’ असे यादव यांनी निदर्शनास आणून दिले.

पर्यावरण रक्षणासाठी सध्या श्रीमंत देशांकडून गरीब देशांना वर्षाला ८० अब्ज डॉलर निधी पुरविला जातो. मात्र, स्वच्छ ऊर्जेसाठी यंत्रणा उभी करण्यासाठी ही रक्कम पुरेशी नसल्याचे गरीब आणि विकसनशील देशांचे म्हणणे आहे. अशी यंत्रणा उभी करण्यासाठी एकट्या भारतालाच अडीच हजार अब्ज डॉलरची आवश्‍यकता असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने २०१९ ला सांगितले होते. त्यामुळेच, हा निधी देणे म्हणजे दानधर्म करण्यासारखे नसून श्रीमंत देशांचे ते कर्तव्य आणि जबाबदारी आहे, असे यादव यांनी सांगितले.

सहकार्य वाढवू : चीन

उत्सर्जन कमी करण्यासाठी वेगाने कृती करण्याचे आणि पर्यावरण संरक्षणासाठी इतर देशांना अधिक सहकार्य करण्याचे आश्‍वासन आज अमेरिका आणि चीन या देशांनी दिले आहे. जगात कार्बनचे सर्वाधिक उत्सर्जन अमेरिका आणि चीनकडूनच होते. या दोन्ही देशांच्या पर्यावरण मंत्र्यांनी एका मागोमाग एक पत्रकार परिषद घेत उत्सर्जन कमी करणार असल्याचे सांगितले. आम्ही ही आंतरराष्ट्रीय जबाबदारी खांद्यावर घेत असल्याने इतर देशांनाही मोठा फायदा होणार आहे, असे चीनच्या मंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel Conflict : तेहरान अंधारात ! इस्रायली हल्ल्यानंतर इराणमध्ये वीजपुरवठा ठप्प, मध्यपूर्वेत तणाव शिगेला

Nagpur News: क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवासाठी जि.प. कडून २० लाखांची तरतूद

Shikhar Shinganapur Yatra: कावडींचा आज मुंगी घाटात थरार! काळगावडे राजेंनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन, शिखर शिंगणापूर यात्रेत उत्साह..

Sangli Crime : सांगली हादरली! जुन्या वादाचा भयानक शेवट; वाळव्यातील तरुणाचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून

Nagpur News: दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर सेवाज्येष्ठतेत बदल नाही; उच्च न्यायालय ; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला दिलासा नाकारला

SCROLL FOR NEXT