Closing of the Council of Ministers world trade organization Multinational trade policy Patent Geneva sakal
ग्लोबल

जाहीरनामे करून मंत्रिपरिषदेचा समारोप

काही मुद्द्यांवर भारताची तडजोड, पेटंटमधून तूर्त सवलत नाही

गणेश हिंगमिरे

जीनिव्हा : जागतिक व्यापार संघटनेच्या इतिहासात प्रथमच मंत्रिपरिषदेचा कालावधी एका दिवसाने वाढविण्यात आल्यानंतर बहुराष्ट्रीय व्यापारी धोरण अबाधित रहायला हवे, यासाठी सर्व सदस्य देशांनी रात्रभर वाटाघाटी केल्या आणि आज (ता. १७ ) पहाटे सहा वाजता बाराव्या मंत्रिपरिषदेचा समारोप केला. हा समारोप करताना काही सकारात्मक जाहीरनामे करण्यात आले हे विशेष! मंत्रिपरिषदेत काही तोडगा निघाला नाही तरी आपल्याला फायदा होणार असल्याचे माहिती असल्याने भारताकडून कुठल्याही तडजोडीला अधिक महत्त्व दिले जात नव्हते. मात्र, बहुराष्ट्रीय व्यापारात काहीतरी दिले तरच काहीतरी मोठ्या प्रमाणात मिळेल, शिवाय आंतरराष्ट्रीय नातेसंबंधही महत्त्वाचे असतात, या तत्वाला अनुसरून भारताने इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशनसाठीचा कर कालावधी दोन वर्षासाठी वाढविण्यास संमती दिली.

आम्ही पुढील दोन वर्षे इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशनवर कुठलेही कर लावणार नाही, असे अप्रत्यक्षरीत्या ‘डब्लूटीओ’ प्रशासनाला कळविले. तसेच, ‘डब्लूटीओ’च्या महासंचालकांच्या विनंतीला मान देत बौद्धिक संपदा आणि पेटंट सवलतीच्या मागणीवरही भारताने काही अंशी माघार घेतली. कोरोना कालावधीत लस आणि इतर आवश्‍यक औषधे आणि साहित्यासाठी पेटंट नियमातून सवलत मिळावी, अशी भारताची भूमिका होती. परंतु, मंत्रिपरिषदेत वाटाघाटी होऊन केवळ लस निर्मिती करणे आणि ती निर्यात करणे यासाठी परवानगी देण्यात आली.

अन्नसुरक्षा मात्र अबाधित

कृषी उत्पादने आणि मत्स्य व्यवसायाला असलेले अनुदान आणि अन्नसुरक्षा तरतूद अबाधित ठेवण्यात मात्र भारताला यश आले. कोणताही सदस्य देश भारताच्या अनुदान देण्याच्या विरोधात ‘डब्लूटीओ’मध्ये दाद मागणार नाही, हे जीनिव्हा पॅकेजमध्ये नमूद करण्यात आले. परंतु ही सवलत तेराव्या मंत्रिपरिषदेपर्यंतच असेल, त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. पण तरीही, बाराव्या मंत्री परिषदमध्ये भारताला चांगले यश मिळाले असून तूर्तास तरी भारतीय शेतकरी आणि मच्छीमार सुरक्षित झाला आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशनवर कर आकारण्यासाठी भारताला पुन्हा जोरदार मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT