crime news 
ग्लोबल

कोलंबिया : तुरुंगात दंगलीतून भडकली आग, ५१ जण जागीच ठार

पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कोलंबिया येथील एका कारागृहात दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, या प्रयत्नात भीषण आग लागल्याची घटना घडली समोर आली आहे. या घटनेदरम्यान, पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्यांमध्ये एकूण 51 कैदी ठार झाले आहेत. तसेच 24 पेक्षा अधिक कैदी जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याने देशभर हळहळ व्यक्त होत आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल प्रिझन्स एजन्सीच्या अधिकाऱ्याने या घटनेबाबतची माहिती दिली आहे. नॅशनल पेनिटेंशरी अँड प्रिझन इन्स्टिट्यूटच्या प्रवक्त्याने सांगितले की, आतापर्यंत 51 लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत असातना हा अपघात झाला आहे. या घटनेत 24 हून अधिक कैदी जखमी झाले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोलंबियाच्या कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्यात आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, कोलंबियन तुरुंगात 81, 000 कैद्यांची क्षमता असताना आता सुमारे 97,000 केद्यांना ठेवण्यात आले आहे. कोलंबोचे राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी या घटनेसंदर्भात ट्विट करत लवकरच या घटनेची चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले आहे. तुलुआ, व्हॅले डेल येथील तुरुंगात घडलेल्या घटनेबद्दल आम्हाला अतीशय दु:ख झाले आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असं ट्वीट करत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, या घटनेत आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली. कॅराकोल रेडिओच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. या घटनेत 24 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT