ग्लोबल

VIDEO - कांगोत ज्वालामुखीचा उद्रेक; 15 जणांचा मृत्यू

सूरज यादव

ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लाव्हारस हळू हळू शहरात पसरत आहे. त्यामुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत.

गोमा - आफ्रिकन देश कांगोमध्ये ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आहे. गोमा शहराजवळ असलेला नीरागोंगो ज्वालामुखी फुटल्यानं हाहाकार उडाला आहे. लाव्हारस वाहू लागला असून तो प्रमुख मार्गावर आला आहे. या घटनेनं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घाबरलेले लोक घरातून पळून गेले आहे. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 500 हून अधिक घरे बेचिराख झाली आहेत. ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लाव्हारस हळू हळू शहरात पसरत आहे. त्यामुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत.

कांगोत झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जगभरातून मदत केली जात आहे. भारतीय लष्कराची एक तुकडी संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेंतर्गत बचाव कार्यासाठी रवाना झाली आहे. शनिवारी रात्री माउंट निरागोंगोच्या जवळ मोठा स्फोट झाला. त्यानंतर सीमेजवळील 5000 लोकांना सुरक्षित बाहेर काढून रवांडाला पाठवण्यात आलं आहे. तर इतर 25 हजार लोकांना अन्य सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलं आहे.

ज्वालामुखी फुटल्यानंतर काही वेळातच आकाश लाल रंगाचे झाले. चहुबाजुला आगीचे लोट दिसत होते. तर यामुळे घाबरलेले नागरिक सैरावैरा पळत होते. माउंट नीरागोंगो ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं आकाशात धुराचे लोट आणि आग पसरली होती. ज्वालामुखीतून सातत्यानं लाव्हारस निघत आहे. लाव्हारस रस्त्यापर्यंत आला आहे. गोमा शहराची लोकसंख्या 20 लाखांच्या आसपास आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लाव्हारस विमानतळापर्यंत आला असल्याचं समजते.

संयुक्त राष्ट्राने ज्वालामुखीच्या उद्रेकानंतरचे फोटो शेअर केले आहेत. त्यात दिसतं की, विमानांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. लाव्हारस गोमा शहराकडे येत नसल्याचं दिसत आहे. मात्र तरीही खबरदारी घेतली जात आहे. भारतीय लष्कराची एक तुकडीही नागरिकांच्या मदतीसाठी पोहोचली आहे. ज्वालामुखीमुळे हजारो लोकांना त्यांचे घर सोडावे लागले आहे. यामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याचं तर 500 घरं बेचिराख झाल्याची माहिती मिळते.

याआधी 2002 मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. तेव्हा शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. तसंच लाव्हा रस विमानतळाच्या रनवेवर पसरला होता. तेव्हा 250 लोकांना प्राण गमवाले लागले होते तर 1 लाख 20 हजार जण बेघर ढाले होते. जगातील सर्वात सक्रीय अशा ज्वालामुखींपैकी एक असा नीरागोंगो ज्वालामुखी आहे. 1977 मध्ये या ज्वालामुखीच्या उद्रेकात 600 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nursing Student Case : आई-वडील घरी येताच समोर आला धक्कादायक प्रकार; 20 वर्षीय पायलचा दुर्दैवी शेवट, 'नर्सिंग'चे घेत होती शिक्षण

तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल

Solapur Crime : नर्तकी असलेल्या प्रेयसीने भेट न दिल्याने माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन; नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल

Fake Job Scam : बोगस नोकरीची मुलाखत चक्क मंत्रालयात, नागपुरातील तरुणाकडून लाखो रुपये उकळले...धक्कादायक प्रकरण समोर!

Navid Mushrif : नविद मुश्रीफांना शौमिका महाडिकांनी म्हटलं पळपुटे; बहीण-भावाच्या नात्यात दुरावा?

SCROLL FOR NEXT