Donald-Trump 
ग्लोबल

लसीशिवायच कोरोनाचा नायनाट होईल, ट्रम्प यांचा अजब दावा

यूएनआय

वॉशिंग्टन - कोरोना विषाणूचा कोणत्याही लसीशिवाय खात्मा होईल, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने अमेरिकेला मोठ्या प्रमाणात प्रभावित केले आहे. अमेरिकेतील जनतेमध्ये तणावची परिस्थिती आहे. त्यात याठिकाणी बरोजगारीचा दर उच्च स्तरावर पोहचला असताना कोरोना विरोधातील लढा लसीशिवाय जिंकू असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी आपल्या रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लस उपलब्ध झाली नाही तरी कोरोना विषाणू नष्ट होईल, असे म्हटले.

ट्रम्प म्हणाले की, कोणत्याही लसीशिवाय कोरोना नष्ट होईल. हा विषाणू आपल्याला पुन्हा दिसणारही नाही. तुम्ही माझ्या या विधानाने नाराज व्हाल पण जगात अशाप्रकारचे अनेक रोग आले आहेत आणि कोणत्याही लसीशिवाय त्या रोगाचा नायनाटही झाला आहे, असेही ते म्हणाले.   

अमेरिकेत लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 72 हजारहुन अधिक लोकांनी या विषाणूमुळे जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत लसीशिवाय विषाणू नष्ट होईल, असा दावा तुम्ही कोणत्या उद्देशाने करत आहात, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. यावर त्यांनी डॉक्टरांकडे बोट दाखवले. मी केवळ डॉक्टरांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतो.

डॉक्टर असे म्हणत असून हा दावा खरा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माझ्या म्हणण्याचा अर्थ कोरोना विषाणू लगेच नष्ट होईल, असा नाही. पण तो नाहिसा निश्चित होईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

लसीसंदर्भात ते म्हणाले, जर आपण लस शोधण्यात यशस्वी ठरलो तर ते आपल्या फायद्याचेच ठरेल.  ट्रम्प यांच्या या विधानापूर्वी व्हाईट हाऊसमधील कोरोना विषाणूसंदर्भातील जबाबदारीची धूरा सांभाळणाऱ्या डॉक्टर अँटनी फॉसी यांनी लस शोधल्याशिवाय आपण कोरोना विषाणूच्या संकटातून मुक्त होणार नसल्याचे म्हटले होते. जोपर्यंत आपण कोरोना विषाणूवर लस शोधत नाही तोपर्यंत हा विषाणू आपल्यासाठी धोकादायक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT