ग्लोबल

इराण, इराकमध्ये कोरोनाचा हाहा:कार; मध्य पूर्व आशियात चौथी लाट

विनायक होगाडे

दुबई : भारतातील दुसऱ्या लाटेला जबाबदार असलेल्या डेल्टा व्हेरियंटने आता मध्य पूर्व आशियायी देशांत हाहा:कार माजवला आहे. मध्य पूर्व आशियातील बहुतांश देश चौथ्या लाटेचा सामना करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. अर्थात मृत आणि बाधितांचा आकड्याचे आकलन केल्यास या देशातील लोकांनी अद्याप एकही लस घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. लसीकरणाचा वेग कमी असल्यामुळे हर्ड इम्यूनिटी होण्यास विलंब होत आहे. परिणामी मध्य पूर्व आशियायी देशांत चौथ्या लाटेने प्रवेश केला आहे. मध्य पूर्व आशियायी देशातील जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक डॉ. अहमद अल मंधारी म्हणाले की, मध्य पूर्व देशातील २२ पैकी १५ देशांत डेल्टा व्हेरियंटचे रूग्ण आढळून आले आहेत. या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे संसर्गाचा प्रसार वेगाने होत आहे. दोन महिन्यांच्या तुलनेत गेल्या महिन्यात रूग्णसंख्येत ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मृतांच्या आकडेवारीतही १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या दर आठवड्याला ३.१० लाख रुग्ण आढळून येत असून ३५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

बेड आणि ऑक्सिजनसाठी धावपळ

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सध्या इराण, इराक, ट्यूनिशिया, लिबिया या देशात कोरोनाचा प्रसार होत आहे. गेल्या काही आठवड्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. सर्व रुग्णालये रुग्णांनी भरली असून आयसीयू बेडची टंचाई जाणवत असून ऑक्सिजन पुरवठ्यात अडचणी येत आहेत.

केवळ ५.५ टक्के लोकांचे लसीकरण

मध्य पूर्व आशियायी देशात आतापर्यंत ४.१ कोटी लोकांना डोस देण्यात आला आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ५.५ टक्के आहेत. एकूण लसीकरणापैकी ४० टक्के लस ही अधिक उत्पन्न असलेल्या देशांत देण्यात आली आहे.

इस्राईलमध्ये गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ

इस्राईलमध्ये गंभीर रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी २० रुग्ण असताना मंगळवारी ती संख्या ३३ वर पोचली. बुधवारी हाच आकडा ४१ वर आला. ऑगस्टअखेरपर्यंत गंभीर रुग्णांची संख्या दररोज १ हजारापर्यंत पोचू शकते, अशी भीती इस्राईच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. उत्तर आफ्रिकेतील ट्यूनिशियातही कोरोना रुग्णांची वाढ होत आहे.

सौदीतही रूग्ण वाढले

सौदी अरेबियात बाधितांची संख्या सुमारे ५२०,७७४ वर पोचली आहे. आतापर्यंत ८ हजार १८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दक्षता बाळगण्याचे आवाहन सरकारच्या वतीने केले जात आहे. सौदी अरेबियाची लोकसंख्या ३ कोटी असून कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार हा आरोग्य विभागासाठी आव्हान ठरत आहे.

कोरोना स्थिती

मध्य पूर्व आशिया देश (गुरुवारची चोवीस तासातील वाढ)

इराण: ३४,४३३

इराक: १३,२५९

मोरोक्को :८,९९५

पाकिस्तान :४,४९७

लीबिया :२,७३०

यूएई :१,५५०

सौदी अरेबिया: १,२८९

लेबनॉन : १,१०४

जॉर्डन: १,००८

कुवेत: ८५३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT