Baby Boom esakal
ग्लोबल

कोरोना अहवालावर अडले रुग्णालय अन् बाळाचा गर्भातच मृत्यू

प्रसूती वेदनांनी ओरडणारी महिला रुग्णालयाबाहेर प्लॅस्टिकच्या स्टूलवर बसलेली दिसत आहे

सकाळ डिजिटल टीम

बाळंतपणाने त्रस्त असलेली महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने तिला कोविड चाचणी केल्याशिवाय दाखल करून घेणार नाही, असे सांगितले. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आठ महिन्यांच्या बाळाचा आईच्या पोटातच मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनावर टीका झाल्यानंतर उच्च आरोग्य अधिकाऱ्याने माफी मागितली. ही घटना चीनमध्ये घडली.

चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. मध्य चीनमधील शिआन शहरातील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही घटना याच शहरात घडल्याची सांगण्यात येते. एक जानेवारीला महिलेच्या नातेवाइकाने सोशल मीडियावर पोस्ट करून घटनेचा उल्लेख केला होता.

पोस्टमध्ये त्यांनी घटनेचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. ज्यामध्ये प्रसूती वेदनांनी ओरडणारी महिला रुग्णालयाबाहेर प्लॅस्टिकच्या स्टूलवर बसलेली दिसत आहे. तसेच रक्त सांडल्याचे दिसत आहे. नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. तोपर्यंत लाखो नागरिकांनी ती बघितली. यानंतर लोकांनी रुग्णालय प्रशासनावर टीका केली होती.

कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गर्भवतीला सुमारे दोन तास रुग्णालयात दाखल केले नाही. महिलेच्या नातेवाइकाने वेबो या प्लॅटफॉर्मवर ही घटना सांगितली. मात्र, या पोस्टची अद्याप पुष्टी झालेली नाही. या घटनेनंतर शिआनच्या आरोग्य आयोगाचे संचालक लिऊ शुन्झी पुढे आले आणि त्यांनी या घटनेबद्दल माफी मागितल्याची माहिती ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT