America 
ग्लोबल

जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला कोरोनाने नेलं आयसीयूत; वाचा सविस्तर

यूएनआय

न्यूयॉर्क - जागतिक महासत्ता म्हणविणाऱ्या अमेरिकेत कोरोनाने सर्वांत जास्त धूमाकूळ घातला आहे. भारताच्या तुलनेत अमेरिकेत कोरोनाने १०० पटींने अधिक उग्र स्वरुप धारण केले आहे. अमेरिकेच्या तुलनेत देशात कोरोनाचा प्रसार कमी झाल्याची बाब आकडेवारीच्या तुलनात्मक अभ्यासातून स्पष्ट होत आहे. अमेरिकेमध्ये दहा लाख लोकांमागे ३ हजार ८१६ कोरोनाबाधीत सापडतात. तर भारतात हीच संख्या फक्त ३८ एवढी आहे.

वर्ल्डओमिटर या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या कोरोनासंबंधीच्या सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे हे विश्‍लेषण करण्यात आले आहे. अमेरिकेत १० लाख लोकसंख्येमागे २२६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर आपल्या देशात फक्त एक ते दोन व्यक्तींचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याचे प्रमाण आहे. देशात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूदराप्रमाणे कोरोनाच्या चाचणीचा वेगही कमी आहे. असे जरी असले तरी तुलनात्मक दृष्ट्या बाधितांची सापडणारी संख्या देशात कमीच आहे. देशाच्या लोकसंख्येचे प्रमाण आणि घनता बघता कोरोनाचा प्रसार तुलनेने कमी झाल्याचे यातून स्पष्ट होते. लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितच झाला आहे. परंतु तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये नागरिकांना सूट देण्यात आली आहे. आता जर सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही, तर हे आकडे बदलायला फार वेळ लागणार नाही. 

अमेरिकेत मृतांची टक्केवारी जास्त 
अमेरिकेत भारतापेक्षा अडीच पटीने जास्त कोरोना बाधित रुग्ण दगावत आहे. देशात शंभर पैकी ९० तर अमेरिकेत शंभर पैकी ७४ रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. भारताच्या तुलनेत अमेरिकेत आरोग्य सुविधा उत्तम असतानाही बाधीतांच्या वाढत्या संख्येमुळे ती कोलमडण्याच्या स्थितीत आहे. भारतात ही संख्या अशा वेगाने वाढली तर कल्पनाच नको. त्यामुळे नागरिकांनी तिसऱ्या लॉकडाउनच्या काळात सोशल  डिस्टन्सिंगसह नियमांच काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT