coronavirus 26 year old suffers collapsed lung while running with face mask at china 
ग्लोबल

मास्क घालून धावत असताना फुटलं फुफ्फुस...

वृत्तसंस्था

बीजिंग (चीन) : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, सुरक्षित राहण्यासाठी अनेकजण मास्कचा वापर करतात. मात्र, मास्कच्या फायद्यांबरोबरच तोटेही पुढे येत आहेत. मास्क घालून धावल्यामुळे एका युवकाचे फुफ्फुस फुटल्याची घटना येथे घडली. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, प्रकृती गंभीर आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'एक 26 वर्षीय युवक मास्क घालून धावत होता. तीन किलोमीटर धावल्यानंतर त्याच्या फुफ्फुसांवर दबाव वाढला आणि तो बेशुद्द पडला. उपचारासाठी त्याला वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. फुफ्फुसातील तीन महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मास्क घालून धावल्यामुळे, त्याच्या डाव्या फुफ्फुसाला छिद्र पडले आणि तेथून हवा बाहेर येऊ लागली. या दाबांचा हृदयावरही परिणाम झाला आणि दबावामुळे ते डावीकडून उजवीकडे जाऊ लागले. यामुळे फुफ्फुसांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी बीजिंगमध्येच 14 वर्षाच्या मुलाचा मास्कमुळे मृत्यू झाला होता.'

दरम्यान, चीनमधून कोरोना व्हायरसला सुरवात झाल्यानंतर मास्कची सक्ती करण्यात आली होती. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मास्कची सक्ती मागे घेण्यात आली आहे.  बीजिंगमध्ये मास्क वापरण्यास सक्ती नाही. कोरोनाने चीनमध्ये शिरकाव करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Latest Marathi Live Update : भरधाव कारने ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT