ग्लोबल

सर्वांना मोफत प्रतिपिंड उपचार - ट्रम्प

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदी फेरनिवडीसाठी प्रयत्नशील असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी विस्कॉन्सीनमधील सभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. कोरोनावरील प्रतिपिंड उपचार सर्वांना मोफत मिळतील, असे त्यांनी जाहीर केले.

जेन्सव्हील येथील सभेत ट्रम्प यांनी डेमोक्रॅटीक पक्षाचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांच्यावर टीकाही केली. कोरोना चाचणी पॉझॉटिव्ह आल्यानंतर ट्रम्प यांना चौथ्याच दिवशी डिस्चार्ज मिळाला होता. ते म्हणाले की, ‘बरे होण्याची माझी पद्धत सुपर अशी आहे. त्याचवेळी बायडेन हे निराशावादी आहेत. तीन नोव्हेंबरच्या निवडणूकीत तुम्हाला यात निवड करावी लागेल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्याआधी त्यांनी मिशिगन येथील मस्कीगन येथील सभेत इशाराच दिला. ते म्हणाले की, ‘नोव्हेंबरमधील निवडणूकीत डेमोक्रॅटीक पक्षाचा विजय झाला तर कोरोना संसर्गाची तसेच एकूणच अमेरिकेतील स्थिती आणखी खराब होईल. मिशिगनच्या गव्हर्नरने या घडीला शास्त्रीय पद्धतीचा अभाव असलेले कठोर लॉकडाऊन केले आहे. तसेच होऊन आर्थिक घडी सावरण्याची प्रक्रिया विस्कळीत होईल. बायडेन देश बंद करतील. लस आणण्यास उशीर करतील आणि जागतिक साथ दीर्घ काळासाठी वाढवतील.

शाळांबाबत सूचक वक्तव्य
कोरोनावरील उपचारानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर ट्रम्प यांनी प्रचारासाठी झोकून घेतले आहे. त्यांचा १४ वर्षांचा मुलगा बॅरन यालाही कोरोना संसर्ग झाला होता. त्याविषयी ट्रम्प विस्कॉन्सीनमधील सभेत म्हणाले की, बॅरन तरुण असल्यामुळे त्याची प्रतिकाशक्ती चांगली आहे. त्यामुळे इतर अनेक तरुण अमेरिकी नागरिकांप्रमाणे तो विषाणूवर सहज मात करू शकला. शाळा सुरू करण्यासाठी हे सूचक वक्तव्य मानले जात आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रतिपिंड ही सर्वोत्तम गोष्ट आहे. मला जे मिळाले ते प्रत्येकाला मोफत उपलब्ध करून दिले जाईल.
- डोनाल्ड ट्रम्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निपाणीत भीषण अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने प्रसिद्ध व्यावसायिक जागीच ठार, डोक्‍याचा झाला चेंदामेंदा, ओळखही पटत नव्हती!

Success Story : दिवंगत वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मेहनतीने लढली..., कोल्हापूरच्या लेकीने PSI होत राज्याचा मानाचा ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’ मिळवला बहुमान

Minister Jaykumar Gore: युती होणार, कोणीच रोखू शकत नाही; पालकमंत्री जयकुमार गोरे, युती रखडली का? यावर काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : खेड-शिवापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, दीड किलो मीटरपर्यंत वाहतूक खोळंबली

Horrible Accident: मदतीसाठी किंकाळ्या, पण दार उघडलेच नाही… 17 जीव आगीत होरपळले, भीषण बस दुर्घटना!

SCROLL FOR NEXT