ग्लोबल

चीनमधील दोन कोटी मोबाईल बंद; अस्थि कलशांच्या मागणीत वाढ

वृत्तसंस्था

बीजिंग : कोरोना विषाणूचा उद्रेक झालेल्या चीनमध्ये तीन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची सरकारी आकडेवारी सांगण्यात आली असली तरी चीनमधील दोन कोटींहून अधिक मोबाईल बंद झाले आहेत. तसेच अस्थि कलशांच्या मागणीत वाढ झाल्याचेही समोर आले आहे.

चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरातून जगभर पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत 30 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सहा लाखांहून अधिक लोकांना या विषाणूने ग्रासले आहे. चीनपेक्षा इटलीमध्ये मृतांची संख्या तिप्पट झाली आहे. तर, अमेरिकेतही दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे व लाखांहून अधिक जणांना लागण झाली आहे. चीनपेक्षा उशिरा अमेरिकेत हा व्हायरस पसरला आहे. 

चीनने जगाला त्यांच्या देशात कोरोनामुळे 3300 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली आहे. पण, प्रत्यक्षात हा आकडा किती आहे, हे जगाला माहितीच नाही. चीनमधील मोबाईल कंपन्यांच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन-तीन महिन्यांत दोन कोटी ग्राहकांचे मोबाईल बंद झालेले आहेत. चीनमध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे. पण, यामागील कारण हे लोक शहर सोडून गावी गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे मोबाईल पुन्हा नाही चालू झाले तर काहीतरी गडबड आहे, असे सांगण्यात येत आहे. दसरीकडेल चीनमध्ये अस्थि कलशांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत आहेत. वुहानमध्येच पाच हजार अस्थि कलश मागविण्यात आले आहेत. मृतांचा आकडा 3 हजार असेल तर पाच हजार अस्थि कलश कशासाठी हाही प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

बिअर पाजून चौघांनी अत्याचारानंतर संपवलं, मृतदेह तिथंच टाकून पसार; कुत्र्यांनी तोडले लचके, प्रियकरासह तिघांना अटक

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

मोकळे व्हा : बाळाच्या संगोपनात भावनांचा गुंता!

SCROLL FOR NEXT