Coronavirus Positive Indian-American Journalist Dies In New York Hospital
Coronavirus Positive Indian-American Journalist Dies In New York Hospital 
ग्लोबल

Coronavirus : अमेरिकेत कोरोनामुळे भारतीय पत्रकाराचा मृत्यू

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना यातून महासत्ता असलेल्या अमेरिकेचीही सुटका झालेली नाही. अशातच कोरोनाची लागण झाल्यांने न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशााचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे.भारत-अमेरिकेमधील संबंध चांगले निर्माण करण्यात ब्रह्म कांचीबोटला यांचा मोठा वाटा होता असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर दुख: झालं. भारत आणि अमेरिकेमधील संबंध चांगले निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे ते नेहमी लक्षात राहतील. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत माझी सहानुभूती आहे. ओम शांती. ब्रह्म कांचीबोटला हे युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे माजी सहकारी होते. सोमवारी रात्री न्यूयॉर्कमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

Coronavirus : कोरोनाची सुरुवात झाली त्या चीनची सध्या काय आहे परिस्थिती?

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असून अनेक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामधील अनेकांचा मृत्यूही झाला आहे. अमेरिकेत कोरोनाने  आतापर्यंत एकूण १२७२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत १२७२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ८१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT