America-Election 
ग्लोबल

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा खर्च होणार डबल; किती ते वाचा?

पीटीआय

न्यूयॉर्क - यंदाची अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक ही सर्वाधिक महागडी निवडणूक ठरणार आहे. मागील खेपेच्या तुलनेत यंदा या निवडणुकीवर तब्बल दुप्पट खर्च होण्याची शक्यता आहे. हा सगळा खर्च १४ अब्ज डॉलरच्या घरामध्ये जाईल असे, अभ्यासकांचे म्हणणे आहे. सेंटर फॉर रिस्पॉन्सिव्ह पॉलिटिक्स या संस्थेने मागील काही महिन्यांमध्ये राजकीय देणग्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे म्हटले आहे. व्हाइट हाउस आणि सिनेटने देखील प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढविला आहे. यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीवर १४ अब्ज डॉलर एवढा खर्च होणार असून ही आतापर्यंतची सर्वांत महाग निवडणूक असेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सामान्यांकडून देखील मदत
थेट मतदारांकडून तब्बल १ अब्ज अमेरिकी डॉलरच्या देणग्या गोळा करून डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांनी याआधीच उच्चांक केला आहे. त्यांच्या प्रचारगटाने १४ ऑक्टोबरपर्यंत ९३८ दशलक्ष डॉलर एवढा निधी गोळा केला असून ट्रम्प यांनी ५९६ दशलक्ष डॉलरपर्यंत मजल मारली आहे. कोरोनामुळे कंबरडे मोडले असूनही सामान्य नागरिक मात्र आवडत्या नेत्याला  मुक्तहस्ताने मदत करत आहेत.

अब्जाधीश उमेदवार
निवडणुकीवरील खर्च २०१८ च्या मध्यापासून वाढत गेला पुढे २०२० मध्ये देखील हा ट्रेंड कायम दिसतो . उलट याखेपेस हा खर्च अनेकपटींनी वाढला असल्याचे सेंटर फॉर रिस्पॉन्सिव्ह पॉलिटिक्सच्या कार्यकारी संचालिका शैला क्रुम्होल्ज यांनी सांगितले. दहा वर्षांपूर्वी अध्यक्षपदासाठी अब्जाधीश उमेदवारीची कल्पनाही करता येत नव्हती पण मागील दोन टर्ममध्ये यात मोठा बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.

एक लाख लोकांना चुकीच्या मतपत्रिका
न्यूयॉर्क - निवडणुकीमध्येही मोठी हेराफेरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. न्यूयॉर्कमध्ये एक लाख लोकांना चुकीच्या मतपत्रिकांचे वाटप करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाने मतदान केंद्रे हटविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळेही लोकांना मतदान करताना असंख्य अडथळे येत असून अनेकांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे सात कोटी लोकांनी याआधीच मतदानाचा हक्क बजावला होता. जेथे विजयी होण्याची शक्यता कमी आहे तिथून अमेरिकी सरकार मतदान केंद्रे काढून टाकत असल्याची बाब उघड झाली आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

Pune News: शासन निर्णय लवकरच! प्रवेश रद्द केल्यास शुल्क परतावा अनिवार्य; राज्य शिक्षण आयुक्तांची माहिती, पालकांना दिलासा!

Rahuri Bypoll: प्राजक्त तनपुरे यांची माघार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई, अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा?

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये वृक्षतोडीला ब्रेक; राष्ट्रीय हरित लवादाकडून २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT