slovenia 
ग्लोबल

कोरोनामुक्त होण्यात युरोपात या देशाचा पहिला नंबर; वाचा सविस्तर

यूएनआय

लुब्लियाना - कोरोनामुक्त झालेला युरोपमधील पहिलाच देश बनण्याची कमाल स्लोव्हेनियाने केली आहे. ही महामारी नियंत्रणात असल्यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कठोर निर्बंधांची गरज उरली नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

खबरदारी कायम
बंदीस्त सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य
हातांचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य
एकमेकांत किमान पाच फुट अंतर राखणे आवश्‍यक

  • गेली दोन आठवड्यांतील नव्या रुग्णांची संख्या कमी
  • नव्या रुग्णांची रोजची संख्या या कालावधीत सातपेक्षा कमी
  • दोन आठवड्यांतील एकूण संख्या केवळ ३५
  • सुरवातीलाच खबरदारी
  • एप्रिलच्या प्रारंभापासून युरोपीय देशांतून येणाऱ्यांना किमान सात दिवसांचे क्वारंटाइन अनिवार्य
  • नागरीक व संस्थांना भरपाईसाठी जाहीर केलेल्या उपाययोजना मे महिन्याअखेर संपणार
  • यात आर्थिक मदतीचाही समावेश असेल
  • मार्चच्या मध्यापासून शाळा, मैदाने, सांस्कृतिक संस्था, बार, रेस्टॉरंट, हॉटेल, दुकाने बंद
  • खोल्यांची संख्या ३० असलेली हॉटेल पुढील आठवड्यात सुरु
  • ऑस्ट्रीया, इटली व हंगेरी येथील युरोयीप महासंघ देशांचे नागरीक प्रवेश करू शकणार
  • सीमांवरील चौकी निश्‍चीत करण्याची गरज
  • युरोपीय महासंघाबाहेरील नागरीकांना १४ दिवसांचे क्वारंटाइन आवश्‍यक
  • राजनैतिक अधिकारी व मालवाहतूक कर्मचारी यास अपवाद
  • थेट कोरोनाची लक्षणे असलेल्यांना प्रवेश नाही
  • परदेशी नागरीकांचा प्रवेश निर्बंध शिथील करण्यात मोठे पाऊल

संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा इशारा
स्लोव्हेनियात लॉकडाउनमुळे जोरदार निदर्शने झाली होती. त्यावेळी सायकल फेरी काढण्यात आली होती. आता कोरोना संपल्याची घोषणा झाली असली तरी हा रोग देशातून अद्याप गेलेला नसून दुसरा टप्पा सुरु होऊ शकतो असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

पॅकेज वाचविल्याचा आरोप
कोरोना संपल्याची घोषणा करून सरकारने आर्थिक पॅकेज लागू होण्याचा कालावधी एका महिन्याने वाचविला. महामारीसाठी लागू करण्यात आलेले निर्बंध कायम ठेवले असते तर आणखी एक महिना पॅकेज द्यावे लागले असते एका नभोवाणी केंद्राने केला आहे.

प्रसार माध्यमांवर दडपण
स्लोव्हेनियामध्ये लॉकडाउनच्या नावाखाली प्रसार माध्यमांची गळचेपी करण्यात आली. अनेक वृत्तपत्रांनी तसे आरोप केले.

युरोपामधील दुसऱ्या कोणत्याही देशाने महामारी संपली आहे असे जाहीर केलेले नाही. त्यामुळे स्लोव्हेनियाने सावध राहायला हवे. या विषाणूचे अस्तित्व कायम आहे.
- मॅटेजा रोगार, साथीच्या रोगांच्या तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT