viral video 
ग्लोबल

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Couple caught making love at NYC park: व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक जोडपे सार्वजनिक ठिकाणी रोमांन्स करत आहेत.

कार्तिक पुजारी

Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक जोडपे सार्वजनिक ठिकाणी रोमांन्स करत आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका पार्कमधील हा व्हिडिओ आहे. सर्वात आधी हा व्हिडिओ टीकटॉकवर एका युझरने शेअर केला होता. व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला. तसेच अनेकांनी हा प्रकार पाहून संताप व्यक्त केला आहे. लोकांनी जोडप्यावर टीका केली आहे. (love at NYC park viral video)

व्हिडिओमध्ये दिसतंय की, पार्क गजबजलेला आहे. अनेक लोक पार्कमध्ये आहेत. लहान मुलं देखील तेथे खेळत आहेत. पण, पार्कच्या मधोमध्ये एक जोडपे रोमान्स करत आहे. यावेळी त्यांच्या अंगावर काळे ब्लँकेट असल्याचं दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी तरी लोकांनी मर्यादा ठेवावी अशी प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे.

व्हिडिओ शेअर केला जात असून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका पार्कमध्ये, जिथे लोक फिरायला येतात. त्याठिकाणी अशी दृश्य पाहायला मिळणे किती गलिच्छ असल्याचं एकाने म्हटलं आहे. काहींनी या जोडप्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी लैंगिक वर्तन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT