ग्लोबल

कोविडमुळे दक्षिण कोरियात मुलांना नवा आजार?

सकाळवृत्तसेवा

सोल - कोविड-19 विषाणुमुळे मुलांमध्ये प्राणघातक आजाराची लक्षणे दिसण्याची दुर्मिळ नोंद दक्षिण कोरियातही झाली आहे. उपचारानंतर या मुलांची प्रकृती सुधारत आहे. कोरिया रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रातर्फे ही माहिती देण्यात आली. कोविड-19 विषाणुमुळे मुलांना असलेला धोका सुरवातीला कमी मानला जात होता. आता त्यात काहीशी वाढ झाली आहे. कोविड-19 रुग्णांची नोंद झालेल्या पहिल्या काही देशांत दक्षिण कोरियाचा समावेश आहे, पण नंतर काटेकोर आणि भक्कम प्रतिबंधात्मक उपाययोजनेमुळे तेथील संसर्ग आटोक्‍यात राहिला. 

आजाराचे स्वरुप असे 
- "एमआयएस-सी' (मल्टी-सिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन) रोगासारखी लक्षणे 
- रोगाचे अधिकृत नाव ः "पेडीऍट्रीक मल्टी-सिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम पोटेन्शीयली असोसिएटेड विथ कोविड-19' 
- संसर्गामुळे विषबाधा होऊन शरीराला झटके बसणे 
- कावासाकी आजाराशीही संबंध ज्यामुळे रक्तवाहिन्यांना सूज येऊन त्या जास्त लाल पडतात 
- ताप, त्वचेवर पुरळ, ग्रंथींना सूज येणे 
- लक्षणे जास्त गंभीर असल्यास ह्रदयाला सूज 

यापूर्वीची उदाहरणे 
- फ्रान्स, इटली, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिका 
- न्यूयॉर्क प्रांतात शंभर हून जास्त रुग्णांची नोंद 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

- सोमवारी दोन मुले दाखल 
- मुलगा 11 वर्षांचा, तर मुलीचे वय 4 
- रुग्ण व्यवस्थापन प्रमुख क्वाक जीन यांच्या माहितीनुसार कावासाकी रोगावरील उपचार पद्धतीचा अवलंब 
- मुलाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले 
- मुलीला लवकरच "डिस्चार्ज' मिळण्याची अपेक्षा 

दोन्ही मुले उपचारानंतर बरी झाली आहेत. त्यांची कोविड-19 चाचणी निगेटीव्ह आली, पण आम्ही आणखी अभ्यास करणार आहोत. खास करून मुलगा जानेवारी ते मार्च दरम्यान फिलीपीन्समध्ये असल्याने त्याच्यावर जास्त लक्ष असेल. आम्ही दोघांनी कोविड-19 साठी प्रतिपिंड चाचणी करू, जेणेकरून त्यांना संसर्ग झाला होता का हे नक्की समजू शकेल. या चाचणीनंतर ते "एमआयएस-सी' आजाराचे रुग्ण ठरतात का हे ठरवू. 
- जिआँग यून-क्‍यिआँग, रोग प्रतीबंध संचालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT