Corona Vaccination sakal
ग्लोबल

पाकिस्तानात तब्बल साडेसात लाख Corona Vaccine गेले वाया

सकाळ डिजिटल टीम

एका बाजूस अनेक देशात कोरोना व्हॅक्सिन्सचा (Corona Vaccine) तुटवडा होत असताना पाकिस्तानमधील (Pakistan) सिंध प्रांतात तब्बल साडेसात लाख डोस खराब झाले आहेत. लसीचा साठा योग्य प्रकारे न केल्यामुळे आणि त्याबाबत आवश्यक ती काळजी न घेतल्याने साडेसात लाख डोस खराब झाले आहेत. पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी ही बाब उजेडात आणली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काही तांत्रिक कारणास्तव डोस खराब होणे ग्राह्य मानले आहे. मात्र हे प्रमाण जेमतेम दोन टक्के पर्यंतच असावे असा निर्देश या संघटनेने दिला आहे. परंतु, पाकिस्तानमधील अनेक भागांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस खराब झाले आहेत.

पाकिस्तानात पाचव्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिंध प्रांतात खराब झालेल्या लसीमध्ये सिनोवैक दोन लाख वीस हजार, सिनोफर्म 1 लाख 70 हजार,पाकवैक 70 हजार,एस्ट्राजेनेका 23 हजार,मॉडर्न 10 हजार,फायझर 10 हजार आणि स्पुटनिकचे 85 डोस खराब झाले आहेत. सिंध प्रांतातील आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते हे व्हॅक्सीन तापमानामुळे त्याचबरोबर प्रशासनाने यासाठी आवश्यक असणारे कोल्ड स्टोरेज योग्य प्रमाणात उपलब्ध न केल्याने खराब झाले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये अत्यंत संथ गतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सध्या याठिकाणी हिवाळी वातावरण आहे आणि त्यात पाचव्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारने काही टप्प्यापर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट गाठले आहे परंतु अद्याप देशातील लाखो नागरिक लसीकरणापासून दूरच आहेत असा दावा स्थानिक वृत्तवाहिन्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT