Vaccine Sakal
ग्लोबल

जगातील तीन देशात अजूनही लसीकरणाला सुरुवातच नाही

सकाळ डिजिटल टीम

पहिली, दुसरी लाट आल्यानंतर आता तिसरी लाट आल्यास ती थोपवण्याची तयारीही अनेक देशांनी केली आहे.

जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न होत आहे. पहिली, दुसरी लाट आल्यानंतर आता तिसरी लाट आल्यास ती थोपवण्याची तयारीही अनेक देशांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. मात्र जगात तीन देश असेही आहेत जिथं अद्याप लस देण्यात आलेली नाही. उत्तर कोरिया, बुरुंडी आणि इरिट्रिया हे तीन देश आहेत. विशेष म्हणजे चीनचा मित्र असूनही उत्तर कोरियात अद्याप लसीकरण सुरु झालेलं नाही.

जगभरात आतापर्यंत पाच अब्जहून अधिक कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी जवळपास 40 टक्के डोस हे चीनमध्ये देण्यात आले आहेत. चीनने 1.96 अब्ज डोस आतापर्यंत दिले आहेत. तर भारतात 59 कोटी, अमेरिकेत 36.3 कोटी डोस दिले गेले आहेत.

दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये युएई लसीकरणात आघाडीवर आहे. तिथे दर 100 लोकांमध्ये 179 डोस देण्यात आले आहेत. याचाच अर्थ असा की जवळपास 75 टक्के लोकंसख्येला लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील देश युद्धपातळीवर हालचाली करत असताना उत्तर कोरिया, बुरुंडी आणि इरिट्रियाने मात्र अजुन लसीकरण सुरु केलेलं नाही.

जगातील गरीब देशांसाठी कोव्हॅक्स योजना सुरु आहे. त्यातून गरीब देशांना लस पुरवण्यात येत आहे. विकसित देशांच्या तुलनेत या ठिकाणी खूपच कमी प्रमाणात लसीकरण सुरु आहे. जागतिक बँकेनं उच्च उत्पन्न असलेल्या देशांनी जिथे 100 लोकांमागे 111 डोस दिले आहेत तिथे कमी उत्पन्न असलेल्या देशांनी 100 लोकांमागे फक्त 2.4 इतकेच डोस दिले आहेत. गरीब देशांमध्ये विकसित आणि श्रीमंत देशांकडून लशी दान केल्यानंतर लसीकरण मोहिम सुरु होऊ शकली आहे.

कांगोसारख्या देशात 100 लोकांमागे फक्त 0.1 तर टांझानियात 0.4, नायजेरियात 1.9 आणि इथियोपियात 2.0 डोस झाले आहेत. जगात सर्वात कमी डोस या देशांमध्ये देण्यात आले आहेत. जगात 100 लोकांमागे 64 डोस देण्यात आले आहेत. मात्र हेच प्रमाण आफ्रिकी देशामंमध्ये 100 लोकांमागे 6.5 इतकं कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT