covishield 
ग्लोबल

ऑक्सफर्ड लशीला ब्रिटनने दिली मान्यता; फायझरनंतर कोविशिल्डचे होणार लशीकरण

सकाळवृत्तसेवा

लंडन : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राझेनेकाद्वारे विकसित केल्या गेलेल्या कोरोना व्हायरसवरील लशीला ब्रिटनमध्ये मान्यता दिली गेली आहे. या लशीला मान्यता देणारा ब्रिटन हा  पहिलाच देश ठरला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ही लस परिणामकारक ठरत असल्याने या लशीला मंजूरी देण्यात आली आहे. आपत्कालीन वापरासाठी या  'कोविशिल्ड' लशीला मान्यता मिळाली आहे. 

पुढील आठवड्यात या लशीचे लशीकरण सुरु करण्यात येईल. याआधी ब्रिटनने Pfizer-BioNTech च्या लशीला आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे. ही लस आतापर्यंत 600,000 लोकांना दिली गेली आहे. ब्रिटनच्या Medicines and Healthcare products Regulatory Agency (MHRA)ने ही शिफारस केली होती, अशी माहिती ब्रिटन सरकारने दिली आहे.  

प्रसिद्ध केलेल्या एका वक्तव्यात एस्ट्राझेनेकाने म्हटलंय की, या लशीचा पहिला खुराक येत्या बुधवारपासून देण्यात येईल. जेणेकरुन नव्या वर्षात लवकरच लशीकरणास सुरवात होईल. ब्रिटनसोबत झालेल्या करारानुसार पहिल्या तिमाहीत लक्षावधी खुराक देण्याचा मानस आहे. एकूण 100 दशलक्ष खुराक असणार आहेत. 
गेल्या आठवड्यातच कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडला  होता. हा स्ट्रेन आधीच्या व्हायरसपेक्षा अधिक गतीने पसरतो. हा अधिक संसर्गजन्य असून त्याचा जगभरात प्रसार होत आहे. भारतात देखील या नव्या स्ट्रेनचे जवळपास 20 रुग्ण सापडले आहेत. भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटसोबत एस्ट्राझेनेकाची ही लस विकसित केली गेलीय. तशीच तिच्या चाचण्याही केल्या गेल्या आहेत. मात्र, अद्याप भारतात लशीला मान्यता मिळाली नाहीये. ब्रिटनमध्ये या लशीला मान्यता दिली गेल्यानंतर लवकरच भारतात देखील या लशीला मान्यता मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT