Crime News Esakal
ग्लोबल

Crime News: पत्नी अन् सात मुलांची कुऱ्हाडीने हत्या.. पोलिसांसमोर गुन्हा कबूल करत सांगितलं धक्कादायक कारण!

Crime News: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी सज्जाद खोखर याने आपल्या पत्नीसह ७ लहान मुलांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने या गुन्ह्याची कबुलीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये आता सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशा आली आहे. याचा मोठा फटका एका कुटुंबाला बसला आहे. एका व्यक्तीने आपल्या 7 मुलांवर आणि पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली आहे. यामध्ये सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे. आर्थिक अडचण आणि कुटुंबातील सदस्यांना अपुऱ्या पडणाऱ्या अन्नामुळे आरोपीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानमध्ये औषध आणि अन्न यासारख्या मूलभूत गोष्टींच्या किमती गगनाला भिडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडली आहे. आरोपी सज्जाद खोखर याने आपल्या पत्नीसह ७ अल्पवयीन मुलांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी हा आर्थिक अडचणींमुळे खूप अस्वस्थ होता. यामुळे त्याचे पत्नीसोबत भांडणही होत असे. सध्या त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मृतांमध्ये खोखर यांची ४२ वर्षीय पत्नी कौसर, चार मुली आणि तीन मुलांचा समावेश आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, खोखरने कुऱ्हाडीने वार करून सर्वांची हत्या केली आहे. वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे आणि त्याने हे धक्कादायर पाऊल उचलण्याचे कारण देखील सांगितले आहे. मुलांना खायला अन्न देऊ शकत नाही म्हणून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे त्यांने पोलिसांना सांगितले आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील अलीकडील राजकीय घडामोडी आणि 1971 च्या ढाका दुर्घटनेची परिस्थिती यांच्यात तुलना केली आहे आणि चेतावणी दिली आहे की रोखीच्या संकटात असलेल्या देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते.

'डॉन' या वृत्तपत्राने आपल्या एका बातमीत म्हटले आहे की, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) संस्थापक अध्यक्ष खान यांनी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगातून एका संदेशात विद्यमान सरकारला आठवण करून दिली की 'देश आणि संस्थान स्थिर अर्थव्यवस्थेशिवाय टिकू शकत नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT