श्रीलंका
श्रीलंका सकाळ
ग्लोबल

श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर; 36 तासांच्या लॉकडाऊनची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : देशातील हाताबाहेर जाणारी परिस्थिती लक्षात घेता श्रीलंकेने शनिवारी 36 तासांचा देशव्यापी कर्फ्यूची घोषणा केली आहे. लावण्यात आलेला हा लॉकडाउन शनिवारी संध्याकाळपासून लागू केला जाणार असून, सोमवारी सकाळपर्यंत हा लागू असणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. निदर्शनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून या काळात अत्यावश्यक सेवा वगळता लोकांना बाहेर पडता येणार नाही. दरम्यान, 22 दशलक्ष लोकसंख्या असलेला श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात भीषण संकटाचा सामना करत आहे.

आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. गुरुवारी रात्री शेकडो लोकांनी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या कोलंबो येथील निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात 10 जण जखमी झाले. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी 1 एप्रिल 2022 पासून श्रीलंकेत सार्वजनिक आणीबाणी घोषित करणारे राजपत्र जारी केले आहे.

भारताकडून मदत

भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात असून, मदतीचा हात म्हणून भारतातून 40,000 टन डिझेलची खेप श्रीलंकेच्या किनाऱ्यावर पोहोचली आहे. भारताने डिझेलची ही खेप क्रेडिट लाइनखाली देऊ केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT