unesco
unesco 
ग्लोबल

उत्तरप्रदेशातील पत्रकाराच्या मृत्युवरून "युनेस्को'ची टीका 

पीटीआय

न्यूयॉर्क - युनेस्कोच्या महासचिवांनी उत्तरप्रदेशात मागील महिन्यात झालेल्या तरुण पत्रकाराच्या खुनाची दखल घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून त्याला न्याय मिळवून द्यावा आणि बंदुकीच्या टोकावर चालणारी गुन्हेगारी मोडून काढावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. 

शुभम मनी त्रिपाटी या पत्रकाराची उन्नाव जिल्ह्यात दोघा जणांनी गोळीबार करून हत्या केली होती. या घटनेला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांवर खटला चालवावा असे आवाहन महासचिव ऑड्री अझुले यांनी केले आहे. त्यांनी या हत्येचा निषेध केला आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा करून भविष्यातील असे गुन्हे रोखण्यात यावेत, असे त्यांनी म्हटले आहे. युनेस्कोकडून पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी जागतिक स्तरावर जनजागृती केली जाते. 

दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाने उत्तरप्रदेश सरकारला शुक्रवारी नोटिस पाठवून वाळुमाफियांविरोधात बातमी देणाऱ्या त्रिपाठींच्या हत्येची चौकशी करण्याची नोटिस दिली आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानेही या घटनेचा निषेध नोंदविला आहे. त्रिपाठी यांचा 19 जून रोजी उन्नामधील एका दूध बाजाराजवळील हल्ल्यात मृत्यू झाला होता. 

198 - भारतात पत्रकारांवर झालेले हल्ले  (2014-2019) 
40 - हल्ल्यात झालेले मृत्यू 
21 - गुन्हे उघडकीस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT