Ambassador 
ग्लोबल

Thailand Ambassador: जागतिक व्यापार संघटनेत भारतावर टीका करणे राजदूताला पडलं महागात; थायलँडने केली कठोर कारवाई

Criticizing India at the World Trade Organization : जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूटीओ) १३ व्या मंत्रिस्तरीय संमेलनात (एमसी-१३) बोलताना पिटफील्ट यांनी भारताच्या तांदुळ खरेदी धोरणावर टीका केली होती.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारताच्या तांदुळ खरेदी धोरणावर थायलँडच्या राजदूत पिमचानोक वॉनकोपोर्न पिटफील्ट यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भारताने याचा कडक शब्दांत निषेध व्यक्त केला होता. थायलँडमधील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पिटफील्ट यांना राजदूत पदावरुन हटवण्यात आलं असून त्यांना देशात परत बोलावण्यात आलं आहे.(Criticizing India at the World Trade Organization Thailand ambassador expelled)

जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूटीओ) १३ व्या मंत्रिस्तरीय संमेलनात (एमसी-१३) बोलताना पिटफील्ट यांनी भारताच्या तांदुळ खरेदी धोरणावर टीका केली होती. भारत सरकारने यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर थायलँड सरकारने कारवाई केली आहे. अधिकारी पिटफील्ड यांना राजदूत पदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यांना परिषद अर्धवट सोडून परत थायलँडमध्ये येण्यास सांगण्यात आलंय.

थायलँडच्या विदेश सचिवांनी पिटफील्ट यांची जागा घेतली आहे. परिषदेचा पाचव्या दिवशी पिटफील्ट म्हणाल्या होत्या की, भारताचा सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एमएसपीवर तांदुळ खरेदी करण्याचा कार्यक्रम लोकांसाठी नाही, तर निर्यात बाजारावर ताबा मिळवण्यासाठीचे हे धोरण आहे.

भारताने पिटफील्ट यांच्या या टिप्पणीनंतर थायलँडकडे आपला विरोध दर्शवला होता. तसेच डब्ल्यूटीओ प्रमुख, कृषी समितीच्या प्रमुख केन्या आणि यूएईकडे नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी संबंधितांनी गंभीर दखल घेतली आहे. अधिकारी म्हणाले की, थायलँड राजदूतांना बदलण्यात आलं आहे. राजदूतांची भाषा आणि वागणे योग्य नव्हते.

भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पिटफील्ट यांनी चुकीची माहिती समोर मांडली. कारण, धान्य सुरक्षा अंतर्गत सरकार फक्त ४० टक्के धान्य खरेदी करते. इतर धान्य सरकारी मालकीच्या एजेन्सी खरेदी करत नाहीत. शिवाय भारतातून बाजार किंतमीवर आधारित निर्यात केली जाते.

भारतासारखाच थायलँड हा प्रमुख तांदुळ निर्यातक देश आहे. जगातील अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतावर आरोप करताना म्हटलंय की, भारत तांदुळाचे साठवण करुन ठेवत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात किंमतीवर प्रभाव पडत आहे. दरम्यान, २०१८ ते २०२२ या काळात भारत हा जगातील सर्वात मोठा तांदुळ निर्यात करणारा देश ठरला. थायलँड आणि व्हिएतनाम दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT