cute couple in florida offered beer to new neighbours for ice breaking amid pandemic 
ग्लोबल

सख्खे शेजारी! फ्लोरिडातील जोडप्याने वाटली मोफत बिअर; कारण...

शर्वरी जोशी

जसा कुटुंबातील प्रत्येक सदस्य महत्त्वाचा असतो. तसेच शेजारीदेखील तितकेच महत्त्वाचे असतात.  त्यामुळे एखाद्या नवीन ठिकाणी आपण शिफ्ट झालो की तेथील शेजाऱ्यांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी अनेक जण विविध मार्गदेखील अवलंबतात. मग यात अनेकदा शेजाऱ्यांना घरी जेवणासाठी बोलावलं जातं किंवा त्यांना एखादं छानसं गिफ्ट दिलं जातं. यात अनेकदा महिलादेखील विविध मार्गाने शेजारील महिलांशी ओळख करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, अमेरिकेतील फ्लोरिडामधील एखा कपलने शेजाऱ्यांशी ओळख करण्याचा एक भन्नाट मार्ग शोधून काढल्याचं समोर आलं आहे. या कपलने शेजाऱ्यांना एक आगळीवेगळी वस्तू भेट म्हणून दिली आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारं एक कपल कोरोना काळात नव्या जागी शिफ्ट झालं होतं. नवा परिसर, नवी जागा असल्यामुळे या कपलने शेजाऱ्यांशी ओळख व्हावी या हेतून त्यांना एक भन्नाट वस्तू गिफ्ट केली. विशेष म्हणजे त्यांनी भेट दिलेल्या वस्तूची चक्क सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

अमांडा आणि थॉमस इव्हान्स या जोडीने कोरोना काळा सुरु होण्याच्या सुरुवातीला त्यांचं घर फोर्ट मेयर्समधून केप कोरल येथे शिफ्ट केलं. त्यावेळी त्यांनी शेजाऱ्यांशी ओळख व्हावी यासाठी चक्क त्यांना मोफत बिअर दिली. 

अमांडा आणि थॉमस यांनी त्यांच्या घराबाहेर एक भन्नाट बॅनर लावला होता. "आम्ही इथे नवीनच रहायसा आलो आहोत. आम्हाला आमच्या चांगल्या शेजाऱ्यांना भेटायली खूप इच्छा आहे. आम्ही घराच्या उंबरठ्याबाहेर बीअर घेऊन उभे आहोत. ज्यांना कोणाला भेटायची इच्छा आहे. त्यांनी नक्की या. आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहोत", असं या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं.

दरम्यान, हा बॅनर लावल्यानंतरही कोणी भेटायला येईल याची शाश्वती या दोघांना नव्हती. मात्र, मोफत बिअर पार्टी मिळणार असल्याचं समजताच. त्यांच्याकडे असंख्य जणांनी रांग लावल्याचं सांगण्यात येतं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : मुलुंड दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीची स्थापना

Pune Kolhapur Highway accident : पुणे -कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, पत्नी जागीच ठार तर पती गंभीर

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? सूर्यकुमार यादवने स्पष्टच सांगितलं; उस्मान तारीकबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT