Cyclone Mora hits Bangladesh coast, nearly 3 lakh evacuated 
ग्लोबल

'मोरा' चक्रीवादळाची बांगलादेशला धडक

वृत्तसंस्था

ढाका - 'मोरा' चक्रीवादळाने आज (मंगळवार) बांगलादेशच्या किनाऱ्याला धडक दिली असून, तीन लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 

मोरा हे चक्रीवादळ आज सकाळी बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकले. बांगलादेशमधील चिटगाव येथे जोरदार पाऊस होत असून, किनारपट्टीवर गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. या वादळामुळे प्रतितास 117 किमी वेगाने वारे वाहत आहेत. नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

ओडिशाच्या किनाऱ्यावर या वादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे. हे वादळ उपसागराच्या ईशान्य दिशेने बांगलादेशकडे वेगाने सरकत होते. अखेर आज ते बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे चक्रीवादळ तयार झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या वादळाचा परिणाम म्हणून ईशान्य भारतातही जोरदार पाऊस पडत आहे. या चक्रीवादळामुळे भारतातील मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’ द्वेषाचा क्रूर चेहरा उघड: चंद्रशेखर बावनकुळे; पैसे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र!

Diabetes Breathalyzer : डायबिटीज रुग्णांसाठी खुशखबर! ना रक्त-ना दुखणं...आता श्वासातून कळणार शरीरातली साखर, जाणून घ्या काय आहे ही मशीन?

Devendra Fadnavis : नाशिकच्या गोदाकाठी आज फडणवीसांची तोफ धडकणार; ठाकरे बंधूंना काय प्रत्युत्तर देणार?

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT