Drugs esakal
ग्लोबल

शरीर पोखरणारी 'ही' आहेत जगातील 5 घातक Drugs

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा बादशाह समजल्या जाणार्‍या शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूडचा बादशाह समजल्या जाणार्‍या शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीनं आर्यनला अटक केलीय. ड्रग्ज वापराबाबत बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक बडे स्टार्स एजन्सीच्या रडारवर आहेत. एनसीबीनं अनेकांना चौकशीसाठी बोलावलंय, तर काहींना अटकही केलीय. फक्त भारतच नाही, तर जगात असे अनेक देश आहेत, जिथं ड्रग्ज विकणं आणि त्याचं सेवन करणं गुन्हा मानला जातो. आज आम्ही तुम्हाला जगातील पाच सर्वात धोकादायक ड्रग्सबद्दल सांगणार आहोत..

कोकेन (Cocaine Drug) : ड्रग्जच्या दुनियेत कोकेन हे एक प्रसिद्ध नाव आहे. हे ECSTASY, X, XTC सारख्या नावांनी देखील ओळखलं जाते. लोक पावडर आणि इंजेक्शनच्या स्वरूपात याचा वापर करतात. याचं जास्त सेवन केल्यानं मेंदूमध्ये डोपामाइन रसायनाची वाढ होते. addictioncenter.com च्या अहवालानुसार, कोकेनच्या दीर्घकाळ वापरामुळं हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. अतिसेवनामुळे अवयवही निकामी होऊ शकतात.

Cocaine Drug

हेरॉईन (Heroin Drug) : Mephedron किंवा Miau-Miau हे ड्रग्ज पार्ट्यांमध्ये वापरलं जाणारं लोकप्रिय नाव आहे. हे ड्रग्स कॅप्सूल आणि पावडर स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे. या ड्रग्सच्या सेवनानं माणसाच्या शरीरात कमालीचा उत्साह निर्माण होतो. त्याला आत्मविश्वास वाटू लागतो. याचं सेवन करणारी व्यक्ती जास्त बोलू लागते. या ड्रग्सच्या वापरामुळं बोटं थंड आणि निळी पडतात, नाकातून रक्त येण्याची समस्या देखील उद्भवू शकते. अतिसेवनामुळं मृत्यूचा धोकाही वाढतो.

Heroin Drug

एमडीएमए (MDMA Drug) : एमडीएमए किंवा मॉली म्हणून ओळखल्या जाणार्‍या ड्रग्सची इतर नावं देखील सुपरमॅन, रोलेक्स पिंक सुपरमॅन, मॅंडी अशी आहेत. हे ड्रग्स कॅप्सूल, गोळ्या आणि द्रव स्वरूपात उपलब्ध आहे. याच्या सेवनामुळं मळमळ, अंधुक दिसणं यासारख्या समस्या उद्भवतात.

MDMA Drug

केटामाइन ड्रग्स (Ketamines Drug) : केटामाइन ड्रग्स व्हिटॅमिन के, सुपर के, स्पेशल के, ग्रीन आणि के या नावांनी देखील ओळखलं जातं. हे टॅब्लेट आणि पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. या ड्रग्सच्या वापरानं हृदय व रक्ताचा वेग वाढतो. त्याचा अतिवापर एखाद्या व्यक्तीचा जीवही घेऊ शकतो.

Ketamines Drug

मेथामफेटेमाइन ड्रग्स (Methamphetamine Drugs) : मेथामफेटेमाइन नावाची ड्रग्स याबा, क्रिस्टल मेथ, मेथ आणि क्रॅंक या नावांनी देखील ओळखली जाते. हे टॅब्लेट, पावडर आणि क्रिस्टल स्वरूपात देखील उपलब्ध आहे. याच्या सेवनामुळं व्यक्ती खूप आनंदी, उत्साही, आक्रमक आणि गोंधळलेल्या अवस्थेत राहतो. त्यामुळे मानवी हृदय आणि रक्ताचा वेग वाढतो. फुफ्फुस, मूत्रपिंड आणि मेंदूवर याचा खूप घातक परिणाम होतो.

Methamphetamine Drugs

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी डोम येथे दाखल; थोडाचवेळात धडाडणार तोफ

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT