ग्लोबल

DD News भारतातील सर्वात विश्वासू स्रोत, अभ्यासातील दावा

सकाळ वृत्तसेवा

डीडी न्यूज (DD News) आणि टाइम्स ऑफ इंडिया (The Times of India) भारतातील सर्वात विश्वसनीय प्रसारमाध्यमे असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. रॉयटर्स आणि ऑक्सफोर्डच्या अभ्यासात ही दोन्ही प्रसारमाध्यमे सर्वाधिक विश्वासू असल्याचं समोर आलं आहे. भारतातील विश्वासू प्रसारमाध्यमांबाबत करण्यात आलेल्या अभ्यासात असं उघड झालेय की, डीडी न्यूज 46 टक्के आणि टाइम्स ऑफ इंडिया 42 टक्के पूर्ण विश्वास (completely trust) असल्याचं समोर आलं आहे. डीडी न्यूजवर 36 टक्केंनी तर टाइम्सवर 39 टक्केंनी थोडा विश्वास (somewhat trust ) असल्याचं सांगितलेय.

रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ जर्नालिझम (RISJ) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातील थिंक थँक यांनी एकत्रपणे भारतातील सर्वात विश्वासू स्रोतवर अभ्यास केला. 9 सप्टेंबर रोजी हा अभ्यासक्रम प्रकाशित झाला. यामध्ये त्यांना डीडी न्यूज आणि टाइम्स ऑफ इंडिया हे सर्वात विश्वासू प्रसारमाध्यमे असल्याचं दिसली. प्रसारमाध्यमं आणि पोलिस देशातील 25 टक्के विश्वासू असल्याचं अभ्यासात उघड झालं आहे. यासाठी 25 टक्केंनी पूर्णपणे विश्वास असल्याचे सांगितले तर 46 टक्केंनी थोडाफार विश्वास असल्याचं सांगितलं.

रॉयटर्स आणि ऑक्सफोर्ड यांचा ‘Trust in News Project’ 9 सप्टेंबर रोजी प्रकाशीत करण्यात आला. भारत, इंग्लंड अमेरिका आणि ब्राजील या चार देशातील विश्वासू प्रसारमाध्यमांवर अभ्यास करण्यात आला आहे. यासाठी मे ते जून 2021 दरम्यान दहा ते 15 मिनिटांचा चार देशात ऑनलाइन सर्व्हे करण्यात आला. रॉयटर्स आणि ऑक्सफोर्ड यांनी लंडन, अमेरिका, डेटाफोल्हा आणि दिल्लीमधून ऑनलाइन सर्व्हे घेतला. यामध्ये सर्वात विश्वासू बातमी कोण देतं? अलिकडच्या काही वर्षांत बातम्यांच्या विश्वासर्हतेला तडा का गेलाय? त्यामागची कारणे काय? जगभरातील वेगवेगळ्या देशात कशा पद्धतीने प्रसारमाध्यमांचं काम चालते. यामध्ये फरक काय..? सर्व काही या अभ्यासात जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चार देशात घेण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये प्रत्येक देशातून सरासरी दोन हजार जणांनी सहभाग नोंदवला होता. भारतात सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्यात 47 टक्के महिलांचा समावेश होता. तर 46 टक्के सर्वे भरणाऱ्यांचं वय 35 वर्षांपेक्षा कमी होतं. 16.72 टक्के महाराष्ट्रातील तर 12.41 दिल्लीतील लोकांनी सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT