Crime Logo Crime Logo
ग्लोबल

शवगृहात १०० मृत महिलांशी शारीरिक संबंध; बनवले व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

इंग्लंड : महिलांवरील अत्याचाराची संख्या दिवसेंदिवस वाटतच आहे. काही केल्या अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. घरातून बाहेर पडली मुलगी, महिला सुखरूपच घरात येईल याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. या गोष्टींचा अनेकांना राग येत असला तरी त्यापेक्षाही भयानक घटना इंग्लंडमध्ये घडली आहे. नराधमाने महिलांच्या मृतदेहांवर सलग १२ वर्षे शवगृहात बलात्कार केला. डेव्हिड फुलर असे आरोपीचे नाव आहे.

इंग्लंडच्या द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, हा भयानक प्रकार टाऊन हीथफिल्डमध्ये घडला आहे. फुलरने १९८७ पासून १२ वर्षे हेथफील्ड हॉस्पिटलच्या दोन शवगृहांमध्ये जवळपास शंभर महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. मात्र, त्याच्या या कृत्याची साधी कल्पनाही कुणाला लागली नाही. फुलर हा रात्री उशिरापर्यंत शवागारात काम करीत होता. तोपर्यंत इतर कर्मचारी आपापल्या घरी निघून जात होते. फुलर हा इलेक्ट्रिशीयन म्हणून कामाला होता.

फुलरने दोन महिलांची हत्या केल्यानंतर हे प्रकरण उलगडण्यास सुरुवात झाली. त्याची चौकशी केली असता फुलरचा डीएनए तेथे सापडला, त्यानंतर त्याला संशयावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू संपूर्ण प्रकरण उघड झाले. यानंतर फुलरने स्वत: कबूल केले की त्याने सुमारे शंभर महिलांच्या मृतदेहांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

२०११ मध्ये फुलरला पुन्हा अटक करण्यात आली. यावेळी तो एकूण ५१ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला. दोन्ही शवगृहांमध्ये फुलरने बलात्कार केल्याची ७८ मृतदेहांची ओळख पटली. एवढेच नाही तर फुलरच्या घरातून अश्लील छायाचित्रे, मृतदेहासोबतचे अश्लील व्हिडिओ, हार्ड ड्राइव्ह, फ्लॉपी डिस्क, डीव्हीडी आणि मेमरी कार्डसुद्धा सापडले. न्यायाधीशांनी त्याला दोषी ठरवले असून लवकरच शिक्षा होईल.

बलात्काराचे बनवले व्हिडिओ

जवळपास ३४ वर्षांनंतर कोर्टाने फुलरला महिलांच्या मृत शरीरावर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतरही आर्श्‍चय व्यक्त करण्यात येत आहे. फुलरने १२ वर्षे शवागारात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओही बनवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार! राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला; अमित शाहांनी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं?

Solapur Crime: छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकायदा पुतळा बसवल्याप्रकरणी अंकोलीच्या अकरा जणांवर गुन्हा; शासकीय नियमांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT