ग्लोबल

घाईघाईत खाल्ल्याने ओढवला मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

कॅलिफोर्निया : टॅकोस खाण्याची स्पर्धा एका व्यक्तीला महाग पडली असून स्पर्धा जिंकण्यासाठी घाईघाईत खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना कॅलिफोर्निया येथे घडली आहे. डॅना हचिंग्स (41) असे मृत व्यक्तीचे नाव असून मंगळवारी रात्री रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

कॅलिफोर्नियाच्या फ्रेन्सो येथे मंगळवारी "वर्ल्ड टॅको इटिंग चॅम्पियनशिप' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या स्पर्धेत डॅना हचिंग्स यांनीदेखील सहभाग घेतला होता. या वेळी तेथील उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार हचिंग्स यांच्याकडे सर्वांचे लगेचच लक्ष गेले; कारण ते इतरांपेक्षा अतिशय वेगात खात होते. अगदी न चावता थेट गिळत होते. 

त्यानंतर 7 मिनिटांतच हचिंग्स हे अचानक जमिनीवर पडले, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यालादेखील मार लागला. त्यानंतर लगेचच स्पर्धा बंद करण्यात आली व हचिंग्स यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे अद्याप कारण अजून समोर आलेले नाही. तसेच त्यांनी नक्की किती टॅकोस खाल्ले हेदेखील स्पष्ट झालेले नाही. याआधी 2018 मध्ये याच स्पर्धेत एका व्यक्तीने 8 मिनिटांत 73 टॅकोस खात ही स्पर्धा जिंकली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra History: पावणेदोनशे वर्षांपासून दुर्लक्षित समाधीचा शोध! सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका सिंथिया फरार यांची कबर सापडली; इतिहासप्रेमींना मोठे यश

RANJI TROPHY: न्यूझीलंड दौऱ्याआधी शुभमन गिलचा रणजीत फ्लॉप शो! १ रनवर बोल्ड करणारा अजय मंडल आहे तरी कोण?

Young Farmer Death: सकाळी चहाचे हॉटेल, दुपारी शेतात काम; २२ वर्षीय संतोष राऊतच्या मृत्यूने सिसारखेडा हळहळले

Latest Marathi News Live Update : दुष्काळामुळे सरकारी खर्चात २० टक्के कपातीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; 'लाडकी बहीण' योजनेला मात्र धक्का नाही

Kanya Puja Importance: अष्टमीला कन्या पूजन का केले जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि पूजेची परंपरा

SCROLL FOR NEXT