Death sentences of eight Indians in Qatar commuted  Sakal
ग्लोबल

कतारमधील भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा! भारत सरकारच्या प्रयत्नांना यश

कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या आठ माजी नौसेना अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारत सरकारच्या याचिकेनंतर आठ जणांच्या मृत्यूच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या आठ माजी नौसेना अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारत सरकारच्या याचिकेनंतर आठ जणांच्या मृत्यूच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे भारत सरकारच्या प्रयत्नांना यश आल्याचं चित्र आहे. पीटीआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Death sentences of eight Indians in Qatar commuted)

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, माजी नौदल अधिकाऱ्यांच्या शिक्षेप्रकरणी कतार कोर्टाचे दरवाजे भारत सरकारने ठोठावले होते. भारताने याप्रकरणी याचिका दाखल केली होती. कतार कोर्टाने माजी नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा कमी केल्याची माहिती आहे. कायदेशीर टीम अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांशी संपर्कात आहे. सुनावणीवेळी भारतीय राजदूत आणि अधिकारी कोर्टात उपस्थित होते.

आम्ही नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबांसोबत सुरुवातीपासून उभे आहोत. आम्ही कतार सरकारकडे हे प्रकरण वारंवार उपस्थित करत आहोत. अधिकाऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही पुढेही प्रयत्न करत राहू असं मंत्रालयाने म्हटलं आहे.

आरोप काय आहेत?

कतारमधील दाहरा कंपनीत काम करणारे आठ भारतीय यांनी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये आठ भारतीय माजी अधिकाऱ्यांनी इस्राइलसाठी हेरगिरी केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर या अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना कतार कोर्टाकडून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. असे असले तरी कतारने याप्रकरणी कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT