ग्लोबल

OMG! जगातला तिसरा मोठा हिरा सापडला; पहा फोटो

विनायक होगाडे

गॅबोरोन (बोस्टवाना): हिऱ्यांच्या खाणीत खोजकाम करताना आफ्रिकेतील बोस्टवाना देशात जगातील तिसरा सर्वांत मोठा हिरा सापडला आहे. जगप्रसिद्ध हिरे कंपनी ‘द बिअर्स’चा एक भाग असलेल्या ‘देबस्वाना डायमंड’ या कंपनीला हा अनमोल हिरा सापडला असून त्याचे वजन एक हजार ९८ ग्रॅम कॅरेट आहे. देबस्वाना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लिनेटी आर्मस्टाँग यांनी म्हटलंय की, हे दुर्मिळ आणि अमूल्य रत्न हिरे उद्योग आणि बोस्टवानासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सतत संघर्षाला सामोरे जावे लागणाऱ्या आमच्या देशासाठी व कोरोनाकाळातील संकटात हा हिरा आशेचे नवे किरण घेऊन आला आहे.

हा वजनदार हिरा

कंपनीच्या पाच दशकांच्या इतिहासात एवढा मोठा हिरा प्रथमच सापडला आहे. वॅनेंग या खाणीतून एक जूनला बाहेर काढलेला हा हिरा गुणवत्तेच्या आधरावर जगातील आतापर्यंतचा तिसरा मोठा हिरा आहे. त्याचा लांबी ७३मिलिमीटर आणि रुंदी ५२ मिलिमीटर आहे. बोस्टवानाचे अध्यक्ष मॉकग्वीत्सी मसिसी यांना दाखविला आहे. याआधी ‘कलिनन डायमंड’ हा तीन हजार १०६ कॅरेटचा हिरा १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. त्यानंतर जगातील दुसरा मोठा हिरा ‘लेसेडी ला रोना’ हा बोस्टवानामध्येच २०१५ मध्ये मिळाला होता. एक हजार १०९ कॅरेट वजन असलेला हा हिरा टेनिस बॉलच्या आकाराएवढा होता, अशी माहिती ‘देबस्वाना’च्या व्यवस्थापकीय संचालक लिनेटी आर्मस्टाँग यांनी दिली. या हिऱ्याचे मूल्यांकन डायमंड ट्रेडिंग कंपनीकडून काही आठवड्यांत केले जाणार आहे. या हिऱ्याचे नामकरण अद्याप केलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

बोस्टवानातील हिरे उद्योग

- देबस्वाना कंपनीच्या विक्रीतील ८० टक्के वाटा सरकारच्या तिजोरीत

- देशातून हिऱ्यांची ९० टक्के निर्यात

- गेल्या वर्षी कोरोनामुळे खाणीतील उत्पादन बंद असल्याने हिरे विक्रीत ३० टक्क्यांची म्हणजे २.१ अब्ज डॉलरची घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

भारतीय संघ 'घरच्या' मैदानावर पाहुणा म्हणून खेळणार! बाहेरचा संघ यजमान म्हणून मिरवणार; नेमकं असं का होणार? जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : आज रात्री आम्हाला अटक केली जाऊ शकते; CJP संस्थापक अभिजीत दीपके यांचा दावा

Car Stunt Video: धावत्या कारच्या छतावर बसून जीवघेणा स्टंट! Video Viral होताच पोलिसांची कारवाई, तरुणाने कान पकडून मागितली माफी

CM Joseph Vijay Movie : कायदेशीर लढाई आणि सेन्सॉरच्या आक्षेपानंतर अखेर 'जननायकन' रिलीज! थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची धमाकेदार एन्ट्री, 50 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

SCROLL FOR NEXT