Imran-Khan 
ग्लोबल

कर्जबाजारी पाकची कर्जमाफीची याचना

पीटीआय

इस्लामाबाद - आधीच कर्जबाजारी असलेल्या पाकिस्तानने आता जागतिक समुदायाकडे कर्जमाफीसाठी विनंती केली आहे. कोरोना संकट निवळेपर्यंत जागतिक समुदायाने अल्प उत्पन्न गटातील आणि कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांकडून कर्जवसूली स्थगित करावी, अशी याचना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाकिस्तानच्या तिजोरीत अनेक वर्षांपासून खडखडाट असून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. कोरोना परिस्थितीमुळे देशाच्या तुटपुंज्या उत्पन्नालाही पाय फुटले आहेत.  यातून बाहेर पडण्यासाठी इम्रान खान हे विविध वित्तसंस्थांकडे मदतीची याचना करत आहेत. येथील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इम्रान यांनी अविकसीत देशांचे कर्ज माफ करण्याचीही मागणी केली. आमसभेत दहा मुद्दे असलेला अजेंडा सादर करताना इम्रान खान यांनी त्यावर तातडीने कृती करण्याची विनंतीही केली आहे. 

इम्रान यांच्या विनंत्या

  • कोरोना संकट संपेपर्यंत कर्जवसुली स्थगित करावी
  • अविकसीत देशांचे कर्ज माफ करावे
  • विकसनशील देशांच्या कर्जाची फेररचना करावी
  • ५०० अब्ज कर्ज घेण्याची परवानगी द्यावी
  • पर्यावरणासाठी १०० अब्ज डॉलर निधी पाठवावा
  • देशातील भ्रष्ट नेत्यांनी परदेशात नेलेली संपत्ती या देशांनी परत करावी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

Ashes Test: पुन्हा राडा! ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अम्पायरला घेरले; मिचेल स्टार्कचे वादग्रस्त विधान स्टम्प माईकने टिपले, Viral Clip

Latest Marathi News Live Update : पुणे काँग्रेसभवन मध्ये इच्छुकांची मोठी गर्दी

Bank Holiday : आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?

विदर्भाचे दोन्ही पोट्टे IPL मध्ये चमकणार! SRH-Mumbai Indians कडून उतरणार मैदानात, विदर्भाच्या क्रिकेटचा नवा अध्याय!

SCROLL FOR NEXT