ग्लोबल

'डीपफेक पॉर्नोग्राफी'ची येऊ शकते महासाथ; तज्ज्ञांनी दिला इशारा

विनायक होगाडे

आजपासून तीन दशकांच्या आधी लोकांकडे इंटरनेटची सुविधा नव्हती. त्यामुळे त्या काळात पॉर्न कल्चर देखील नसल्यातच जमा होतं. मात्र, जसजसे तंत्रज्ञानात बदल होत गेला तसतसे पॉर्नोग्राफीचं जग देखील विकसित होत गेलं. आता यासंदर्भातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याला बदलून त्याची इमेज मॉडीफाय करण्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता आलेल्या ऍडव्हान्स्ड डीपफेक तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया आता आणखीनच सोपी झाली आहे. मात्र, या सगळ्याचाच खूप मोठा तोटा होणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

काय आहे डीपफेक टेकनिक?

डीपफेक एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करुन कुणाही व्यक्तीच्या शरीरावर कुणाही व्यक्तीचा चेहरा ठेवला जाऊ शकतो. आणि ही टेक्नोलॉजी इतकी ऍडव्हान्स्ड आहे की कुठेच यामधलं एडीटींग समजून येत नाही. अथवा असे व्हिडीओ खोटे आहेत, हे आपण ओळखू शकत नाही.

डीपफेक टेक्नोलॉजी काही काळापूर्वीच जेंव्हा मार्केटमध्ये व्हायरल झाली होती तेंव्हा लोकांना वाटलं होतं की, यामुळे फेक न्यूजच्या प्रकारात अधिक वाढ होऊ शकते. कारण कोणत्याही राजकीय नेत्याची इमेज वापरुन कोणतंही वक्तव्य त्याच्या तोंडात घालणं यामुळे अधिकच सोपं होणार आहे. यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फेक न्यूज पसरण्याची शक्यता 100 पटीने वाढली आहे. मात्र, आता या टेक्नोलॉजीचे खतरनाक पैलून समोर येत आहेत.

डीपफेक्सचे विशेषज्ज्ञ हेन्री एजडर हे या टेक्नोलॉजीच्या विकासाबाबत खूपच बारकाईमध्ये अभ्यास करत आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, या डीपफेकची क्रेज 2017 च्या आसपास सुरु झाली. शेफील्डमध्ये राहणारी हेलेन मोर्ट एक लेखिका आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी एका पॉर्न वेबसाईटवर आपल्या डीपफेक इमेजेस पाहिल्या. या इमेजेस 2017 पासून इंटरनेटवर होत्या. बीबीसीसोबत बोलताना हेलेन यांनी म्हटलं की, ही चित्रे पाहून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. हेलेन यांनी पुढे म्हटलं की, मी जेंव्हा या इमेजेस पाहिल्या तेंव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला की, मी असं काय केलं होतं की मला हा दिवस पहावा लागतोय? मी कसलीच चूक न करता देखील मला माझ्याविषयीच लाज वाटू लागली.

मात्र, हेलेन यांना एका गोष्टीचा दिलासा वाटला की, त्यांच्या चेहऱ्याचा वापर करुन डीपफेक व्हिडीओ बनवला गेला नव्हता. या इमेजेस आता हटवल्या गेल्या आहेत मात्र, इंग्लंडमध्ये इमेजेससोबत मॅनिप्यूलेशन करणं क्राईम समजला जात नव्हता. मात्र, त्यामुळे हेलेन यांना आतापर्यंत हे समजलं नाहीये की, कुणी त्यांच्या या इमेजेस एडीट केल्या होत्या.

डरहम युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मेक्ग्लायन यांनी याबाबत म्हटलंय की, सध्या तरी डीपफेक तंत्रज्ञानाची शिकार झालेले लोक फार कमी आहेत, मात्र, यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवणार आहेत, एवढं नक्की. जर आपण या तंत्रज्ञानावर नियंत्रण आणलं नाही तर याचीही मोठी महासाथ येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT