Democratic threat in the United States 
ग्लोबल

अमेरिकेत लोकशाही धोक्‍यात ; "डेमोक्रॅट' सीमा नंदांचा हल्लाबोल

पीटीआय

वॉशिंग्टन : अमेरिकेतील लोकशाही धोक्‍यात आली असून, दररोज एका संस्थेवर हल्ला होत असल्याचा घणाघाती आरोप डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या नवनियुक्त "सीईओ' सीमा नंदा यांनी आज केला आहे. ट्रम्प प्रशासनाकडून लोकशाही मूल्यांचा गळा घोटला जात असल्याचा आरोपही भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक असलेल्या नंदा यांनी केला. 

डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) मागील महिन्यात नंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेतील मोठ्या राजकीय पक्षाच्या "सीईओ'पदी नियुक्त होणाऱ्या नंदा या भारतीय-अमेरिकी समुदायातील पहिल्याच नागरिक आहेत. डेमोक्रॅटिक पक्षात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय समितीच्या नियमित कामकाजाची जबाबदारी नंदा यांच्यावर आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या "सीईओ' म्हणून नंदा यांच्यासमोर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्याचे मोठे आव्हान आहे. या माध्यमातून अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधिगृहात बहुमत मिळविण्याचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उद्दिष्ट आहे. ट्रम्प यांचा 18 महिन्यांचा कार्यकाळ हा अमेरिकेसाठी प्रचंड अवघड होता. विद्यमान राजवट लोकशाहीच्या मुळावर उठली आहे, अशी सडकून टीका नंदा यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

ST Bus: एसटी प्रवाशांसाठी मोठा दिलासा! NCMC कार्डचा बॅलन्स संपला तरी चिंता नको; बसमध्येच वाहकांकडून करता येणार टॉपअप

Medical Breakthrough: मानवाच्या शरीरात डुकराचे मूत्रपिंड! ९ महिने डायलिसिसपासून मुक्त राहून रुग्णाने रचला इतिहास, वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम

Latest Marathi News Update : गणेश चतुर्थीच्या रात्री बेळगावमध्ये आगीत चार जणांचा मृत्यू

2 हजार रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शुल्काबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बँकांना दिले आदेश

SCROLL FOR NEXT