Terrorist 
ग्लोबल

सावधान! दहशतवादी घेताहेत गैरफायदा

पीटीआय

न्यूयॉर्क - कोरोनामुळे जगभरात लॉकडाउन असून सर्व व्यवहार बंद पडले आहेत. मात्र, दहशतवादी संघटना या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी दिला आहे.

युवकांच्या मनातील राग आणि नैराश्‍याला चुकीची दिशा देत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा मुकाबला करताना आपण एका पिढीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असे गुटेरेस म्हणाले. 

‘यूएन’ने पाच वर्षांपूर्वी युवक, शांतता आणि सुरक्षा याबाबतचा ठराव मान्य केला होता. गुटेरेस यांनी आज त्याचा आढावा घेतला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रतिनिधींबरोबर बोलताना गुटेरेस म्हणाले,‘‘सध्या सर्व जण घरी बसून आहेत आणि त्यांचा खूप वेळ इंटरनेट आणि सोशल मीडियावर जात आहे. याचा अनेक बेकायदा संघटना फायदा घेत असल्याचे दिसत आहे. सध्याच्या युवापिढीपुढे आधीच अनेक आव्हाने आहेत. जगातील दर पाच युवकांपैकी एक जण शिक्षण, नोकरीपासून वंचित आहे. अशा परिस्थितीत या युवकांची मने भरकटविणे सोपे असते आणि त्याचाच फायदा दहशतवादी संघटना घेतात. या पिढीला वाचविणे आवश्‍यक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT