dissatisfaction over high power bill in occupied Kashmir pakistan government policy angry reaction from locals Sakal
ग्लोबल

Inflation : व्याप्त काश्‍मीरात वीजबिलावरून असंतोष

पाकिस्तान सरकारच्या धोरणाचा निषेध; स्थानिकांकडून संतप्त प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

मुझफ्फराबाद : महागाईत पाकिस्तानची जनता होरपळत असताना व्याप्त काश्‍मीरमधील जनता देखील याविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. महागाई, अवास्तव कर आकारणी आणि अव्वाच्या सव्वा आकारली जाणाऱ्या वीज बिलांच्या निषेधार्थ व्याप्त काश्‍मीरमधील जनता रस्त्यावर उतरली असून अनेक शहरांतील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील ठप्प पडली होती.

मुझफ्फराबाद, मिरपूर, रावळकोट, कोटली यासह अन्य महत्त्वाच्या शहरातील दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठानांनी आज कडकडीत बंद पाळला. या बंद आंदोलनात व्यापारी वर्गांने उस्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पाकिस्तान सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘रियासत हमारी, कब्जा तुम्हारा, नामंजूर-नामंजूर’. तसेच ‘गुंडागर्दी नही चलेगी’ अशाही घोषणा देण्यात आल्या. व्याप्त काश्‍मीरमधील जनता सुरक्षा दलाच्या अत्याचाराने त्रस्त आणि संतप्त झाली आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन होत असून राजकीय नेत्यांची धरपकड केली जात आहे.

व्याप्त काश्मिरात नैसर्गिक ऊर्जा स्रोत विपुल असताना आणि विजेची उपलब्धता असतानाही नागरिकांना विजेची गरज भागविण्यासाठी पाकिस्तान सरकारच्या धोरणावर अवलंबून राहावे लागत आहे. गेल्या सात दशकांपासून पाकिस्तान सरकारने व्याप्त काश्‍मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान भागातील नैसर्गिक स्रोतांची लूट केली असून त्या बदल्यात नागरिकांना काहीही दिलेले नाही. उलट त्यांचे शोषण सुरू आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने नागरिकांची गाऱ्हाणी पाकिस्तान सरकारच्या कानावर वेळोवेळी घातली.

मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. वीज बिलावरून असंतोष पसरला असल्याने असंख्य नागरिक आज रस्त्यावर उतरले. व्याप्त काश्‍मीरमधील कार्यकर्ते अहमद अयुब मिर्झा म्हणाले, ‘‘ आजचे आंदोलन बेकायदा कर आकारणी आणि वीज बिलाच्या विरोधात होते. अंशदानात कपात करण्यात आली आहे. गव्हाचा तुटवडा आणि भारनियमन यांच्याविरोधात अनेक महिन्यांपासून कायदेशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. लोकांनी ठिकठिकाणी निषेध आंदोलन सुरू केले असून वीज बिल न भरण्याचे आवाहन केले जात आहे. या बिलावर प्रचंड कर आकारणी केली जात असून ती असह्य आहे. त्यामुळे वीज बिलांची होळी केली जात आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT