Divorce Temple esakal
ग्लोबल

Divorce Temple Viral News : जगातलं सगळ्यात अनोखं 600 वर्ष जूनं मंदिर, महिलांशी आहे खास संबंध

जग अजबगजब गोष्टींनी भरलेलं आहे. तिथल्यां कथाही तेवढ्याच रोमांचक आहेत. जाणून घेऊया.

धनश्री भावसार-बगाडे

Divorce Temple Japan : घटस्फोट कोणत्याही जोडप्यासाठी विशेषतः महिलेसाठी दुःखदच असतो. घटस्फोटाने पती पत्नीच नाही तर दोन कुटुंबही वेगळे होतात. त्यापेक्षाही वाईट परिणाम मुलांवर होतो. समाजात घटस्फोटाला चांगले सजले जात नाही. पण जेव्हा पती पत्नीतलं नातं फारच खराब होतं त्यावेळी फक्त घटस्फोटाचा मार्ग उरतो.

जपानच्या कनागवा प्रांतमध्ये कामाकुर शहरात मतसुगाओका तोकेई जी (Matsugaoka Tokei-ji Temple) मंदिर आहे, ज्याला डिव्होर्स टेम्पल म्हणून ओळखलं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या मंदिराला डिव्होर्स टेम्पल म्हणून का ओळखलं जातं? इथे पती पत्नीमध्ये घटस्फोट केला जातो का? हे मंदिर साधारण ६०० वर्ष जूनं आहे.

Divorce Temple

जगात असे अनेक समुदाय आहेत जिथे घटस्फोट फार वाईट समजला जातो. घटस्फोटानंतर महिलांचे जीवन फार कठीण होते. अशाच घटस्फोटीत महिलांसाठी जपानमध्ये एक मंदिर बनवण्यात आलं आहे. हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचं आहे. या मंदिराची निर्मिती साधारण ६०० वर्षांपूर्वी महिलांना सशक्त बनवण्यासाठी करण्यात आली होती. या मंदिराला डिव्होर्स टेम्पलच्या नावाने ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की, हे महिलांसाठी दुसरं घर होतं. या मंदिराविषयी काही रोमांचक गोष्टी जाणून घेऊया.

Divorce Temple

जेव्हा जपानमध्ये महिलांना अधिकार नव्हते तेव्हा या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. घरात हालापेष्टा सहन करणाऱ्या महिलांना इथे आधार मिळत असे. हे मंदिर त्यांच्यासाठी एक प्रकारे दुसरे घर होते.

पीडित महिलांचा आधार

मीडिया रिपोर्टनुसार हे एक बौद्ध मंदिर आहे. बुद्धिस्ट नन काकुसान शीडो-नी यांनी १२८५ मध्ये हे मंदिर बनवले होते. जपानमध्ये ११८५ ते १३३३ मध्ये महिलांची स्थिती फार खराब होती. त्यांना कोणत्याच प्रकारचे अधिकार नव्हते. जर एखादी महिला आपल्या विवाहात खुश नसेल आणि कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरत असेल तर ती इथे येऊन राहत असे.

Divorce Temple

मंदिर देत सर्टिफीकेट

या मंदिराने काही काळाने महिलांना अधिकृतरित्या घटस्फोटीत म्हणून सर्टिफीकेट देणंही सुरू केलं. जेणेकरून ती आपलं आयुष्य आनंदाने जगू शकेल. सर्टिफीकेटमुळे महिलांना कायदेशीररित्या लग्नाच्या बंधनातून स्वातंत्र्य मिळत होतं. या मंदिराला महिलांना सक्षम करण्याचे प्रतिक म्हणून ओळखलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT