World Trade Centre 
ग्लोबल

अमेरिकेत पहिल्यांदाच घडलं असं! हडसन नदी, WTCनं अनुभवली दिवाळी

पहिल्यांदाच इथं दिवाळीचा उत्साह पहायला मिळाला

Amit Ujagare (अमित उजागरे)

न्यूयॉर्क : अमेरिकेत यंदा दिवाळीचं सेलिब्रेशन सार्वजनिकरित्या धुमधडाक्यात झालेलं पहायला मिळालं. दरम्यान पहिल्यांदाच वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दिवाळीच्या थीममध्ये रोषणाई करण्यात आली आहे. तसेच हडसन नदीच्या दोन्ही तीरांवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीचा आनंद इथल्या लोकांनी लुटला.

न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या भल्या मोठ्या इमारतीवर २ नोव्हेंबरी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते ४ नोव्हेंबरपर्यंत सातत्यानं दिवाळीच्या थीमवर आधारीत प्रकाशयोजना आणि अॅनिमेशननं ही इमारत झळाळून निघाली. यामुळं सर्व अमेरिकन नागरिकांनी दिवाळीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. WTCवर केलेल्या या रोषणाईतून आम्ही शांतता, सौहार्द आणि एकतेचं प्रतिक अनुभवलं असं डर्स्ट ऑर्गनायझेशनचे मार्क डॉमिनो म्हणाले.

न्यू जर्सी येथील साऊथ एशियन एंगेजमेंट फाउंडेशनद्वारे आयोजित केलेल्या या सर्व अमेरिकन जनतेला दिवाळीचा अनुभव समर्पित करण्यात आला. NYPD नं वर्ल्ड ट्रेड सेंटरसह एक औपचारिक कलर गार्डचं आयोजणं केलं होतं. यावेळी अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेन यांनी अमेरिकेचे राष्ट्रगीत आणि 'ओम जय जगदीश हरे' या लोकप्रिय भारतीय श्लोकाचं सादरीकरण केलं.

“आम्हाला खूपच आनंद होत आहे की, आम्ही पहिली वार्षिक 'ऑल-अमेरिकन दिवाळी' न्यूयॉर्क शहरातील पोलीस अधिकाऱ्यांना समर्पित केली. एक भारतीय वंशाचा पोलीस अधिकारी म्हणून, या शहराच्या चिरस्थायी भावनेचं प्रतीक असलेलं 'वर्ल्ड ट्रेड सेंटर' या महोत्सवासाठी उजळून निघालेलं पाहून मला विशेष आनंद होतोय” अशी भावना एनवायपीडीचे अध्यक्ष आनंद नारायण यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT