Jerome Delay
ग्लोबल

घाबरू नका! ओमिक्रॉनचा संसर्ग अतिसौम्य | Omicron

सकाळ डिजिटल टीम

न्यूयॉर्क : कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' (omicron) या प्रकारामुळे जगभरात घबराट पसरली आहे. भारतातही त्याचे दोन रुग्ण आढळले आहेत. मात्र, ओमिक्रॉन अतिसौम्य असून त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत कोरोना मृत्युदरात (corona virus death rate) वाढ झाली नसल्याचा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) (who) व तज्ज्ञांनी केला आहे. विविध देशांनी ओमिक्रॉनमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लादलेले निर्बंध मागे घेऊन घबराटीचे वातावरण संपविण्याचे आवाहनही डब्ल्यूएचओने केले आहे.

ओमिक्रॉनमुळे लादलेले निर्बंध मागे घ्या, WHO चे आवाहन

ओमिक्रॉन कोरोनाच्या डेल्टा या मागील प्रकारापेक्षा अधिक प्राणघातक नाही, असे दक्षिण आफ्रिकेतील अनेक अहवाल सूचित करतात. त्यामुळे घाबरण्याऐवजी सावधगिरी बाळगत आशावादी राहण्यावरही संघटनेने भर दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयांच्या माहितीनुसार ओमिक्रॉनचे निदान झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे किंवा त्यांचा मृत्यू झाल्याचे कोणतेही अहवाल नाहीत. बहुतेक रुग्णांना तीव्र डोकेदुखी, मळमळणे, चक्कर येणे, नाडीची गती वाढणे आदी लक्षणे आहेत, याकडेही डब्लूएचओने लक्ष वेधले आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर जगभरात घबराट पसरली. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह डझनावधी देशांनी प्रवासावर निर्बंध घातले. कोरोनाचा हा नवीन प्रकार मागील प्रकारांपेक्षा धोकादायक आहे का, हे स्पष्ट नसल्याचे वैज्ञानिकांनी सांगूनही अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या. याबद्दल द.आफ्रिकन वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. अँजेलिक कोएत्झी म्हणाल्या की, वैद्यकीयदृष्ट्या जगाच्या या प्रतिक्रियेचे समर्थन करता येत नाही. ओमिक्रॉनची लागण झालेल्या बहुतेक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. रुग्णांची प्रकृती गंभीर नाही. त्यामुळे, घावरण्याची गरज नाही.

लंडन येथे ओमिक्रॉन

ओमिक्रॉन आढळून आल्यानंतर या संसर्गाला बोट्स्वाना व्हेरिएंट असे म्हटले जात होते. परंतु हा व्हेरिएंट आफ्रिकेत आढळून येण्यापूर्वी लंडनमध्ये होता, असा दावा आफ्रिकी डॉक्टरांनी केला आहे. इस्त्राईलच्या तेल अवीवच्या शेबा मेडिकल कॉलेजचे डॉ. एलाड माओर यांनी लंडन येथे ओमिक्रॉनचे अस्तित्व आफ्रिकेत आढळून येण्यापूर्वीच होते, असे म्हटले आहे. डॉ. माओर हे परिसंवादासाठी लंडनला गेले होते. २३ नोव्हेंबरला घरी आल्यानंतर काही दिवसांत त्यांना लक्षणे दिसू लागले, असा दावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahua Moitra: तुम्ही इतके स्वस्त आहात का? आमच्या लोकांना ४ कोटी आगाऊ अन् दरमहा १ कोटी; ठाकरेंच्या खासदारांना सवाल!

Monorail: मोनोरेल सुरू होणार पण प्रवाशांच्या खिशाला कात्री, तिकीटांच्या किंमती वाढणार? नवे दर किती आणि कधीपासून लागू?

लग्न होऊनही 5 वर्षांपासून लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहतेय रसिका सुनील, नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इम्तियाज जलील यांच्या विधानाला ठाकरे गटाचा पाठिंबा, देशात हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप

Kolhapur Water Crisis: कोल्हापुरात पाणीबाणी, एकाच वेळी सर्व योजना बंद पडण्याची इतिहासात पहिलीच घटना; भोगावती, पंचगंगेच्या पातळीत मोठी घट

SCROLL FOR NEXT