us election donald trump 
ग्लोबल

पराभव मान्य नाहीच; ट्रम्प यांची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव!

सकाळ डिजिटल टीम

पेन्सिल्वेनिया - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अजुनही निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारण्यास तयार नाही. एका पाठोपाठ एक पराभव होत असतानाही प्रत्येक निकालावर ते न्यायालयात आव्हान देत आहेत. तिथंही मार खाल्ल्यानंतर त्यांनी आव्हान दिलं आहे. पेन्सिल्वेनियामध्ये इलेक्टोरल मतमोजणीत त्यांचा पराभव झाला आहे. या निकालानंतरही त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार टीमचे म्हणणे आहे की, पेन्सिल्वेनियाच्या इलेक्टोरल मतांबाबतच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये पेन्सिल्वेनिया जनरल अॅसेम्ब्लीला निवड करण्याचा अधिकार द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. 

न्यायालयाचा निकाल जरी ट्रम्प यांच्या बाजुने आला तरी याचा मुख्य निकालावर काहीच फरक पडणार नाही. जो बायडेन इलेक्टोरल कॉलेजच्या निकालानुसार मोठ्या फरकाने जिंकले आहेत. त्यामुळे जो बायडेन हेच पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील आणि ते 20 जानेवारी 2021 रोजी शपथ घेतील हे निश्चित झालं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील रूडी गिलियानी यांनी म्हटलं की, याचिकेमध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. तसंच यामध्ये पेन्सिल्वेनिया नियुक्त करण्यात आलेल्या इलेक्टोरल कॉलेजच्या निकाल फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. याशिवाय जनरल अॅसेम्ब्लीला नव्या इलेक्टोरल कॉलेजची परवानगी द्यावी असंही याचिकेत म्हटलं आहे.

याआधीही ट्रम्प यांनी पेन्सिल्वेनियाच्या निवडणूक निकालावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांची ती याचिका 8 डिसेंबरलाच फेटाळून लावली होती. ट्रम्प यांनी निवडणुकीत भ्रष्टाचाराचा आरोप करत अनेक प्रमुख राज्यांमध्ये खटले दाखल केले होते. यात एका पाठोपाठ एक सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT