Trump Impeach 
ग्लोबल

ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग मंजूर; कार्यकाळपूर्तीच्या आधीच गच्छंतीची नामुष्की

सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात म्हणजेच कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणाचा ठपका ठेवत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली.  अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध दुसरा महाभियोग प्रस्ताव पारित करण्यात आला.  महाभियोगावरील चर्चेनंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षावर दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव दाखल होण्याची नामुष्की ओढावली आहे.

त्यांच्याविरोधातील हा महाभियोगाचा प्रस्ताव 197  च्या विरोधात 232  मतांनी संमत झाला आहे. विशेष म्हणजे 10 रिपब्लिकन खासदारांनी देखील या महाभियोगाच्या बाजूने मतदान केले आहे. आता हा प्रस्ताव 19 जानेवारीला सिनेटमध्ये आणला जाईल. 

कॅपिटल हिल हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पंचविसाव्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले आहे. याबाबतचा ठराव 223 विरुद्ध 205 मतांनी मंजूर झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

विचित्रच! जाहिरातीचं शूटींग अन् खांदा निखळला; स्टार खेळाडू IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेला मुकणार, वाढली डोकेदुखी

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Numerology: मूलांक १ असलेल्या लोकांवर का असते श्री गणेशांची कृपा?गणपती बाप्पा अन् अंक १ चा काय आहे संबंध?

SCROLL FOR NEXT