Donald Trump Likely To Be Arrested Today In New York Hush Money Case
Donald Trump Likely To Be Arrested Today In New York Hush Money Case  
ग्लोबल

Donald Trump: कदाचित हे माझं शेवटचं पत्र...डोनाल्ड ट्रम्प यांना आज अटक होणार; काय आहे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज त्यांना अटक होणार असल्याची धक्कादायक माहिती स्वतः दिली होती. मंगळवारी अटक केली जाऊ शकते, असं ट्रम्प दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. तसेच समर्थकांनी अटकेचा विरोध करावा असे आवाहनही त्यांनी केले होते. (Donald Trump Likely To Be Arrested Today In New York Hush Money Case )

न्यूयॉर्कच्या काही महिलांना देण्यात आलेल्या पैशांच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणी आज ट्रम्प यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना ई मेल पाठवत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

ई-मेलमध्ये कदाचित हे माझं शेवटचं पत्र असू शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल आभार. या लढाईत विजय आपलाच होईल आणि आपण पुन्हा व्हाईट हाऊस जिंकू, असंही ट्रम्प यांनी समर्थकांना केलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.

दोन दिवसांपूर्वी...

सोशल मीडिया नेटवर्कवर एक पोस्ट लिहिली होती. मॅनहट्टनच्या जिल्हा अटॉर्नी कार्यालयातून अवैधरित्या लीक झालेल्या माहितीतून अटकेचे संकेत मिळाल्याचं त्यांनी म्हटलं होते.

नेमकं काय आहे प्रकरण?

हे प्रकरण पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलशी संबंधित आहे. तिचे खरे नाव स्टेफनी क्लिफर्ड आहे. तिचे म्हणणे आहे की, तिचे ट्रम्प यांच्यासोबत 10 वर्षांपूर्वी अफेअर होते. मात्र ट्रम्प यांनी असं काही नसल्याचं म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी स्टॉर्मीला तिचे आणि त्यांचे लैंगिक संबंधांबद्दल मौन बाळगण्यासाठी 1.30 लाख डॉलर्स दिले होते, असा आरोप आहे. याच प्रकरणी आता चौकशी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT