वॉशिंग्टन - व्हाइट हाउसपर्यंत आंदोलनाचा वणवा येऊन धडकला. 
ग्लोबल

डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउसच्या खंदकामध्ये

यूएनआय

वॉशिंग्टन - जॉर्ज फ्लॉईड मृत्युप्रकरणी आंदोलनाचा अमेरिकेतील वणवा थेट व्हाइट हाऊसपर्यंत येऊन धडकला. आंदोलकांनी लाफीएट पार्क परिसर घोषणांनी दणाणून सोडला. गुप्तचर अधिकाऱ्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी रात्री खंदकात नेल्याचे वृत्त आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हे वृत्त सर्वप्रथम ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले. त्यानुसार ट्रम्पना सुमारे तासभर तेथे थांबावे लागले. दहशतवादी हल्यासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी या खंदकाचा आधार घेतला जातो. रिपब्लीकन पक्षाच्या एका सदस्याने नाव गुप्त राखण्याच्या अटीवर ही माहिती दिली. खासगी विषयांवर सार्वजनिक टिप्पणी करण्याचा अधिकार नसलेली ही व्यक्ती आहे. त्याच्या माहितीला प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला, पण त्यानेही स्वतःचे नाव गुप्त ठेवले.

आंदोलकांनी दगडफेक केल्याने तसेच पोलिसांनी लावलेल्या बॅरीकेडसला धडका दिल्या. आंदोलनाची तीव्रता पाहून सुरक्षा अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड टॉवरवरील दहशतवादी हल्यानंतर व्हाइट हाउस संकुलात इतक्‍या तीव्रतेचा सावधानतेचा इशारा दिला जाण्याच्या काही प्रसंगात याची नोंद केली जात आहे.

ट्रम्पना सुरक्षेची काळजी
ट्रम्प यांनी आपल्याला सुरक्षेची काळजी वाटत असल्याचे सल्लागारांशी बोलताना सांगितले. त्यांनी खासगीत तसेच सार्वजनिक पातळीवरही गुप्तचर यंत्रणेच्या कामाचे कौतूक केले. शुक्रवारी रात्रीच्या या प्रसंगानंतर शनिवारी ते फ्लोरीडाला गेले आणि त्यांनी स्पेसएक्‍स अवकाशयान उड्डाणाचा ऐतिहासिक प्रसंग पाहिला. 

सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित शिष्टाचार आणि नियमांविषयी ‘व्हाइट हाउस’ तर्फे भाष्य केले जात नाही.
- जुड डीअर, व्हाइट हाउस प्रवक्ता

सुरक्षात्मक उपाययोजना आणि कार्यवाहीच्या पद्धतीबाबत आम्ही भाष्य करीत नाही.
- गुप्तचर यंत्रणेचा खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk : फडणवीसांनी घडवला इतिहास! Starlink चं इंटरनेट सगळ्यांत पहिलं महाराष्ट्रात.. इलॉन मस्कच्या कंपनीसोबत झाला करार

अप्पी आणि अमितने ८ वर्ष का लपवून ठेवलं त्यांचं नातं? स्वतः सांगितलं कारण; म्हणाले- आम्हाला अजिबात...

AUS vs IND: भारताच्या फिरकी जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स! चौथा T20I जिंकून टीम इंडियाची मालिकेत आघाडी

Latest Marathi Live Update News : दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील इमारतीला मोठी आग, घराल माणसं अडकल्याची भीती

Beautiful Villages India: निसर्गाचा गुपित! भारतातील 5 सुंदर गावं जे तुम्हाला मंत्रमुग्ध करतील

SCROLL FOR NEXT