Missile Sakal
ग्लोबल

तिसऱ्या महायुद्धासाठी चिथावणी देऊ नका; रशियाचा युक्रेनला इशारा

‘युक्रेनने शांतता चर्चा थांबविली आहे आणि आता ते इतरांना युद्धात सहभागी होण्यास सांगत आहेत. युक्रेनने तिसऱ्या महायुद्धासाठी चिथावणी देणे थांबवावे.

पीटीआय

‘युक्रेनने शांतता चर्चा थांबविली आहे आणि आता ते इतरांना युद्धात सहभागी होण्यास सांगत आहेत. युक्रेनने तिसऱ्या महायुद्धासाठी चिथावणी देणे थांबवावे.

मॉस्को - ‘युक्रेनने (Ukrain) शांतता चर्चा थांबविली आहे आणि आता ते इतरांना युद्धात (War) सहभागी होण्यास सांगत आहेत. युक्रेनने तिसऱ्या महायुद्धासाठी (Third War) चिथावणी देणे थांबवावे, अन्यथा अण्वस्त्र हल्ल्याची शक्यताही नाकारता येणार नाही,’ असा इशारा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी आज दिला.

लाव्हरोव्ह यांनी एका मुलाखतीदरम्यान अमेरिका आणि युक्रेनवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की,‘युक्रेनने शांतता चर्चा मध्येच थांबविली. अमेरिका आणि ब्रिटनने आडकाठी आणल्याने चर्चेतून तोडगा निघाला नाही. तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही, असे प्रत्येक जण वारंवार म्हणत आहे. ही अशी चिथावणी देणे थांबवावे. तसेच, या संघर्षात ‘नाटो’ने सहभागी होण्याची युक्रेनची मागणी रशियाला पूर्ण अमान्य आहे.’

युद्धाच्या आघाडीवर

  • युक्रेनमधील रेल्वे स्थानके आणि इंधन साठे रशियाकडून लक्ष्य

  • लुहान्स्क भागातील क्रेमिना शहर रशियाच्या ताब्यात

  • खेरसन भागात युक्रेनकडून रशियाचा शस्त्रसाठा नष्ट, ७० सैनिकही मारले

  • दोनेत्स्क भागात रशियाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू

  • रशियाचे चार रणगाडे, १३ चिलखती वाहने, १५ दुचाकी गाड्या, इंधनाच्या दोन गाड्या आणि एक विमानविरोधी तोफ नष्ट

  • मारिउपोलमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी युक्रेनचे ‘यूएन’ला साकडे

...म्हणून रशियाची घाई

लंडन : दुसऱ्या महायुद्धात ९ मे या दिवशी रशियाने विजय मिळविला होता. पुढील महिन्यात या तारखेपर्यंत युक्रेनमध्ये निर्णायक विजय मिळविण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचा अट्टहास असल्यानेच ते आक्रमक लष्करी कारवाया करण्याचे निर्णय घेत आहेत, असा दावा ब्रिटन सरकारने केला आहे.

शाळेवर बाँबवर्षाव

किव्ह : रशियाच्या रणगाड्यांनी आज दोनेत्स्क भागात तोफगोळ्यांचा जोरदार मारा केला. या माऱ्यात एका शाळेत आश्रय घेतलेल्या चौघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये नऊ वर्षांच्या एका मुलीचा आणि १४ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. गेल्या २४ तासांत १७ वेळा नागरी वस्त्यांवर हल्ले झाले असल्याचे येथील युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कमी उंचीचा आंदोलक, पळून थकताच जवानाने उचलून कडेवर घेतल; पोलिसांकडे सोपवलं, VIDEO VIRAL

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

SCROLL FOR NEXT