ग्लोबल

लहानग्यांना लस देण्याऐवजी ती दान करा; WHO नं केलं आवाहन

विनायक होगाडे

जिनिव्हा : जगभरात सध्या कोरोनाच्या (Corona) विषाणूने थैमान घातलं आहे. भारतात सध्या दुसरी लाट हाहाकार माजवत आहे. जगभरात सध्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यानुसार लसीकरणास (Corona Vaccination) सुरवात झाली आहे. मात्र, यासंदर्भातच जागतिक आरोग्य संघटनेने श्रीमंत देशांना आज शुक्रवारी एक विशेष आवाहन केलं आहे. WHO ने म्हटलंय की, आपल्या लहान मुलांना कोरोनावरील लस देण्याऐवजी लशीचे ते डोस गरीब देशांना दान करावेत. कोरोनाच्या या महासाथीचं दुसरं वर्ष हे पहिल्या वर्षाहून अधिक गंभीर आणि धोकादायक ठरत असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. (Dont vaccinate kids give Covid19 doses to Covax instead WHO chief Tedros Adhanom Ghebreyesus)

जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रोस अधनॉम घेब्रेयसस यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की श्रीमंत देशामध्ये आता लहान मुलांना तसेच किशोरवयीन मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे तर दुसरीकडे गरीब देशांमध्ये आता कुठे आरोग्य कर्मचारी आणि गरजू लोकांना लस देण्यास सुरवात झाली आहे. तरूण व निरोगी लोकांना लस देण्याऐवजी त्यांनी कोवॅक्स ग्लोबल व्हॅक्सिन-शेअरिंग योजनेस त्यांचे डोस दान करावेत आणि सर्व देशातील सर्वात जास्त गरजू लोकांना कोरोनापासून संरक्षण मिळावं, असं त्यांनी म्हटलं.

पुढे त्यांनी म्हटलं की, दुर्दैवाने आता आम्ही आता हा खेळ पाहत आहोत. लशीचा बहुतांश पुरवठा विकत घेतलेल्या मुठभर श्रीमंत देशांमध्ये आता कमी जोखमीच्या गटांना लसी दिली जात आहे. मला समजतंय की, काही देशांना त्यांच्या मुलांना आणि पौगंडावस्थेतील मुलांना लसी का द्यायच्या आहेत, मात्र, मी त्यांना पुन्हा विचार करण्यास तसेच याऐवजी कोव्हॅक्सला लस देण्याचा सल्ला देतो. निम्न व निम्न-मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांमध्ये, कोरोना लसीचा पुरवठा आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचार्‍यांना देखील पुरेसा होत नाहीये आणि तातडीने संरक्षणाची गरज असणारे अनेक जण याची वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT