doomsday clock 100 seconds to midnight 
ग्लोबल

जगबुडी जवळ आली; आता उरले फक्त शंभर सेकंद!

सकाळ डिजिटल टीम

Doomsday Clock : आता जगबुडी होणार. होय. प्रलयाची वेळ जवळ आलीय. 2019पासून जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातलाय. त्याकाळात मनुष्याची जिवीतहानी प्रचंड झाली. युरोप, अमेरिका, ब्राझील या देशांनी कोरोनाचा हाहाकार अनुभवला. प्रलय काय असतो, हे जणू त्याचं उदारहणच होतं. आता जग जगबुडीच्या जवळ आल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय. त्याचं कारण प्रलयाच्या घड्याळानं दिलेले संकेत आहे. त्या घड्याळानुसार आता जगबुडीला केवळ 100 सेकेंद उरले आहेत. त्यामुळं जगभरात अनेकांची चिंता वाढलीय.

जगभरातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जगाचा सर्वनाश होणार, अशी अफवा अधून-मधून पसरत असते. अगदी 2012मध्ये जगबुडी होणार असल्याचीही चर्चा झाली होती. त्यावरून हॉलिवूडमध्ये 2012 हा सिनेमाही आला होता. आता पुन्हा एकदा जगबुडी किंवा प्रलयाची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेत असलेल्या प्रलयाच्या घड्याळाने धोक्याचे संकेत दिले आहेत. या घड्याळानुसार, जर, मध्य रात्रीचे बारा वाजले तर, जगात प्रलय येणार आहे. सध्या या घड्याळात मध्य रात्रीचे  12 वाजण्यासाठी केवळ 100 सेकंद बाकी आहेत. जगात कोरोना व्हायरस पसरायला डिसेंबर 2019पासून सुरुवात झाली होती. तर, जानेवारी 2020मध्ये प्रलयाचे घड्याळ पुढे सरकले. सध्या ते मध्यरात्रीला 100 सेकंद बाकी असल्याचे दाखवत आहे. 2021मध्ये घड्याळात कोणताही बदल झालेला नसून, घड्याळ मध्यरात्रीला 100 सेकंद बाकी असल्याचे दाखवत आहे.

काय आहे घड्याळ?
अमेरिकेतील बुलेटिन ऑफ ऍटोमिक सायंटिस्ट या स्वयंसेवी संस्थेने प्रलयाच्या घड्याळाची उभारणी केली. त्यात 13 नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांचा समावेश होता. 1947पासून हे घड्याळ जगबुडीची वेळ दाखवत आहे. काही वेळेला घड्याळाचे काटे मध्यरात्रीच्या दिशेने तर काही वेळेला मध्यरात्रीच्या विरुद्ध फिरताना दिसतात. अणु युद्धाचा धोका आणि हवामानातील बदल अर्थात ग्लोबल वॉर्मिंग याचा घड्याळावर प्रामुख्याने परिणाम दिसतो.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घड्याळात झाले बदल
1947मध्ये घड्याळाची वेळ मध्यरात्रीसाठी सात मिनिटे बाकी असल्याची दाखवत होते. त्यानंतर आजवर 24 वेळा घड्याळाची वेळ पुढे मागे झाली आहे. आजवर मध्यरात्रीला 17 मिनिटे बाकी असल्याची सर्वाधिक वेळ घड्याळाने दाखवली आहे. तर 2020-21मध्ये बदललेल्या वेळेनुसार मध्यरात्रीला सर्वांत कमी 100 सेकंद बाकी असल्याचं दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: आई, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही... ; खाजगी व्हिडिओवरून ब्लॅकमेल झाल्यामुळे मुंबईत CA ने संपवले जीवन

Video : वाढदिवस ठरला शेवटचा..! केक कापताना घडली भयंकर घटना, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल..

कुटुंबात किती लोक? कोणत्या जातीचे आहात? आता संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या सांगू शकणार; जनगणनेत दिसणार 'हा' पर्याय

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्याने सरकार विरोधात विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

Polytechnic Admissions 2025: कोणते कॉलेज निवडू, कोणती शाखा निवडू ? पॉलिटेक्निक प्रवेशाकरिता काउंटडाऊन सुरू

SCROLL FOR NEXT